साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीबाबत केलेले चिंतन या पुस्तकात पाहावयास मिळते. भारतीय संस्कृती सर्व जातिधर्म, ज्ञानविज्ञान आणि सर्व काळाचा मेळ घालून वाढते. जगात जे जे काही चांगले आहे, ते ते बरोबर घेऊन, सर्वांना जवळ घेऊन प्रवाहित होणारी अशी ही भारतीय संस्कृती आहे असे साने गुरुजी म्हणतात. आजच्या काळातही त्यांचे विचार वाचनीय व मननीय आहेत.