GST E WAY BILL MARGADARSHIKA (PRASHNOTTAR SWARUPAT)

BK00571

New product

₹ 140 tax incl.

More Info

व्यापार कोणताही असो, मालाची वाहतूक एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होत असेल तर त्यासाठी  राज्यांच्या सीमेवर वाहतूक कर भरावा लागतो. या कराची वसुली करण्यासाठी तिथे टोलनाके असतात. हा कर पूर्वी प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळा असे. पण आता जीएसटी कर कायदा अस्तित्वात आल्यामुळे एक देश - एक करप्रणाली लागू झाली आहे. त्यामुळे टोलनाक्यांची गरज संपली. पण व्यापाऱ्यांनी नियमांनुसार वाहतूक कर  भरावा, याची तपासणी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी जीएसटी अंतर्गत जी व्यवस्था आहे, तिला 'ई - वे बिल' म्हटले जाते. केंद्रीय आणि राज्य जीएसटी कर वेगवेगळे असून ई वे बिलांमार्फत करवसुलीचा अधिकार राज्यांकडे आहे. या तरतुदी कशा  आहेत, ई वे बिल म्हणजे काय, ते कसे भरावे, कोणी भरावे, त्याचे फायदे तोटे, आणि ते न भरल्यास होणारा दंड, याबद्दल बऱ्याच व्यापाऱ्यांमध्ये अज्ञान आहे. कारण ही सारी माहिती फक्त इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे. व्यापारी, लघु व मध्यम उद्योजक यांसह वाहतूकदार व ट्रक ड्रायव्हर्सपर्यंत ही माहिती पोचावी, त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन व्हावे, यासाठी ई वे बिल मार्गदर्शिकेत सर्व माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात मराठीत देण्यात आली आहे.  

Features

PublisherSakal Prakashan
AuthorADVT.GOVIND PATWARDHAN
LanguageMarathi
ISBN978-93-89834-62-8
BindingPaperback
Pages95
Publication Year2021

Reviews

Write a review

GST E WAY BILL MARGADARSHIKA (PRASHNOTTAR SWARUPAT)

GST E WAY BILL MARGADARSHIKA (PRASHNOTTAR SWARUPAT)