{"title":"Career Guidance","description":"","products":[{"product_id":"mazi-padvi-maze-career","title":"Mazi Padvi Maze Career","description":"\u003cp\u003eबारावीनंतर पूर्ण करता येऊ शकतील अशा ६९ पदव्यांची सांगोपांग माहिती देण्याचा प्रयत्न ‘माझी पदवी : माझे करिअर’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रा. विजय नवले यांनी केला आहे. करिअर मार्गदर्शनाच्या क्षेत्रातील आपल्या २७ वर्षांच्या अनुभवाचे सार ह्या पुस्तकाच्या निमित्ताने लेखकाने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या हाती ठेवले आहे. प्रत्येक पदवीसाठी एक प्रकरण अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना केलेली आहे. प्रत्येक प्रकरणात त्या-त्या पदवीसाठीची पात्रता, तिचा कालावधी, प्रवेशपरीक्षा, अभ्यासक्रमाचे स्वरूप, अभ्यासक्रमातील प्रमुख विषय, पदवी मिळवल्यानंतर खुले होणारे उच्च शिक्षणाचे पर्याय, करिअरच्या संधी, भविष्यातील वाव आदींचा समावेश करण्यात आला आहे. एखाद्या पदवीला प्रवेश घेण्यापूर्वी कोणती स्वाभाविक कौशल्ये विद्यार्थ्याच्या अंगी असणे अपेक्षित आहे, याची कल्पना ‘कोणी प्रवेश घ्यावा?’ ह्या मुद्द्याखाली देण्यात आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जी कौशल्ये विकसित होणे अपेक्षित आहे, त्यांचीही यादी देण्यात आली आहे. काही पदव्यांकरिता सरकारी आणि खासगी क्षेत्रांतील संधींचे स्वतंत्रपणे विवेचन— वेतनमानासह— करण्यात आले आहे. पुस्तकात काही पदव्युत्तर पदव्याही समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रभरात आजवर सुमारे ४,०००पेक्षा अधिक करिअरविषयक व्याख्याने आणि १५,०००हून जास्त विद्यार्थ्यांना वैयक्तिक समुपदेशन करणाऱ्या प्रा. नवले यांच्या अनुभवाचे हे पुस्तक म्हणजे संचित आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा मिळो आणि त्यांना खऱ्या अर्थाने ‘मार्ग-दर्शन’ होवो, ही अपेक्षा.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47266669428867,"sku":"BK01279","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/MaziPadvi-MazeCareer_Front.jpg?v=1781072632"}],"url":"https:\/\/sakalpublications.com\/collections\/career-guidance.oembed","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}