विश्वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून...
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री...
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने...
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप...
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे....
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत...
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या...
पुष्पा तारे यांच्या ‘साद’ या लेखसंग्रहात ललित आणि ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या लेखांचा समावेश आहे. परदेशात केलेल्या प्रवासाचे वर्णन यात असून, नाती, भेटलेल्या अनेक व्यक्ती, सण-समारंभ, सिनेमा, पर्यावरण, जाहिराती, स्त्री शक्ती अशा विविध विषयांची मांडणी त्यांच्या पुस्तकातून केली आहे.
लेखिकेला आयुष्यात आलेले हे अनुभव जसे तिला काही महत्त्वाचं शिकवून गेले तसेच ते वाचक म्हणून आपल्या साऱ्यांचे जीवनही समृद्ध करतात. या पुस्तकात एक व्यावसायिक म्हणून लेखिकेला आलेले अनुभव मांडताना तिच्याकडे येणाऱ्या ग्राहक वर्गाबद्दल आणि सामाजिक परिस्थितीबद्दल आपल्याला बरीच रंजक माहिती मिळते. या पुस्तकामध्ये काही ठिकाणी काढलेली चित्र शाब्दिक आशयाला साजेशी आणि...
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप रत्नाकर वैद्य यांनी लिहिलेले माझी भटकंती या छोटेखानी पुस्तकात त्यांनी केलेल्या भारतातील आणि भारताबाहेरील भटकंतीचा लेखाजोखा मांडला आहे.
या पुस्तकातील लेखांचा साधारण विषय हा आयुष्यात आलेल्या या अनुभावांनी गोष्टींकडे आणि जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी कशी दिली असा आहे.
‘मोलाची ठेव’ या कृष्णा पाटील यांनी लिहिलेल्या कथासंग्रहात साधारण २५ कथा आहेत. लेखकाने मनोगतात म्हटल्याप्रमाणे त्यांना स्वतःला एक वाचक म्हणून काल्पनिक आणि अद्भुत जगाच्या कथांमध्ये रस नाही. त्यामुळे या संग्रहातील कथांमध्ये अतिशय कमी काल्पनिक अंश असून यातील सर्व कथा या बहुतकरून लेखकाला आलेले अनुभव, पाहिलेल्या वा भेटलेल्या व्यक्ती, अनुभवलेले प्रसंग यातून...
मनीषा आवेकर लिखित भवताल या पुस्तकात आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगांचे, व्यक्तींचे, त्यातून घडणाऱ्या स्वभाव विशेषांचे आणि मनाला जे भावले त्याचे रेखाटन केलेले आहे.
शास्त्रीय संगीत ऐकायला खूप जणांना आवडते, पण अनेकांना त्यातले काही कळत नाही. त्यामुळे संगीताचा खरा आनंद घेता येत नाही. हे जाणून प्रसिद्ध शास्त्रीय संगीत व भावगीत गायिका सायली पानसे शेलिकेरी यांनी सकाळ सप्तरंग पुरवणीत 'गंधार' या नावाने सदर लेखनास सुरुवात केली. अल्पावधीतच हे सदर सर्वसामान्य संगीतप्रेमी आणि अभ्यासकांनाही आवडले. त्या सदराचे हे पुस्तकरूप.
माणसाचं जगणं हे अनाकलनीय असतं. ते कधी समजतं, तर कधी समजण्याच्या पलीकडे गेलेलं असतं. हा प्रवास कधी जवळचा, लांबीचा, तर कधी न संपणारा वाटतो. खोल जगण्यातून आलेल्या अनुभवांचा बारा वर्षांपासून केलेल्या फि रस्तीतून हा लेखक उत्तम कांबळे यांचा एक दिशासूचक मागोवा.
वेड्यांची शर्यतधावणं हा सृष्टीचा नियम असला तरी मुक्कामाची ठिकाण न ठरवता नुसतंच धावत सुटणं चुकीचंच. अशा धावण्यात आपण केवढे तरी फिरल्यासारखं वाटलं तरी तो भ्रम असतो. उत्तम कांबळे यांनी 'वेड्यांची शर्यत' या लेखसंग्रहाच्या माध्यमातून अशा निरर्थक धावणाऱ्यांना होणारा भ्रम भेदकपणे अभिव्यक्त केला आहे.
वेगवेगळ्या दिग्गज कलावंतांच्या चंदेरी दुनियेतील संघर्ष आणि कारकीर्दीवर प्रकाश टाकणारे पुस्तक म्हणजे चित्रकर्मी