सकाळ दैनिकापासून, 1932पासून, सुरू झालेला "सकाळ' माध्यम समूह महाराष्ट्रातील घराघरांत, सर्वदूर पोहोचलेला माध्यम समूह आहे. मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, दूरदर्शन वाहिनी, इंटरनेट पब्लिशिंग तसेच पुस्तक प्रकाशन विभाग अशा विविध शाखांमधून "सकाळ' माध्यम समूहाचा विस्तार झाला आहे. सकाळ माध्यम समूहाने नेहमीच आपल्या वाचकांना स्थानिक ते जागतिक घडामोडी, माहिती आणि मनोरंजन, शिक्षण आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतील अद्ययावत ज्ञान देण्याचे धोरण ठेवले आहे. "सकाळ पुस्तक प्रकाशना'च्या सूचीवर नजर टाकली तरी हेच धोरण दिसून येते. सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी माहितीपर, प्रेरणादायी आणि रंजनपर पुस्तके असे "सकाळ प्रकाशना'च्या पुस्तकांचे स्वरूप आहे. यामध्ये आपल्याला आहार, आरोग्य, आर्थिक साक्षरता, व्यतिमत्त्व विकास, पालकत्व, शेतीविषयक अशा विविध विषयांसोबतच प्रेरणादायी व्यतिचरित्रेही दिसतात. प्रवासवर्णन, व्यावसायिक संदर्भ, पर्यावरण अशा विषयांसोबतच मुलांसाठी वाचनीय पुस्तकांचाही समावेश या पुस्तक सूचीमध्ये असलेला आढळेल. त्या त्या विषयातील तज्ज्ञ, अनुभवी लेखक हे या पुस्तकांचे वैशिष्ट्य सांगता येईल. आवश्यक संपादकीय संस्कार, अंतर्गत सजावट व मांडणी, उत्कृष्ट कागद, छपाई आणि एकूणच उत्कृष्ट निर्मिती यांमुळे ही पुस्तके अधिकच देखणी होतात. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी या पुस्तकांचे मूल्य नेहमीच वाजवी ठेवण्यात येते. "सकाळ'च्या सर्व कार्यालयांमार्फत तसेच महाराष्ट्रातील प्रमुख विक"ेत्यांमार्फत ही पुस्तके सर्वत्र उपलब्ध करून देण्यात सकाळ प्रकाशन यशस्वी ठरले आहे. पुस्तकांचे विषय, लेखक, निर्मिती अशा सर्वच घटकांतील उत्कृष्टतेच्या आग"हामुळे ही पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. हीच परंपरा आगामी पुस्तकांमार्फत पुढे नेण्यास सकाळ पुस्तक प्रकाशन विभाग बांधील आहे.
Shital Wadkute
Prashant