More Info
अधिक उत्पादनासाठी व विविध किडींपासून पिकाचे रक्षण करण्याच्या हेतूने शेतकरयांकडून अनेकदा रासायनिक कीडनाशके फवारली जातात. रासायनिक कीडनाशकांचे पिकांवर तसेच माणसांवर होत असलेले दुष्परिणाम यांची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत कीडनाशकांमधील विषारी अंश पोटात गेल्यामुळे होणाऱ्या कॅन्सर, वंध्यत्व, अशा अनेक आजारांची माहिती रासायनिक फवारणीयपूर्व तपासण्यांमधील विविध त्रुटींविषयी चर्चा रासायनिक कीडनाशकांऐवजी जैविक /सेंद्रिय कीडनाशकांचा वापर करण्याचे आवाहन सेंद्रिय आणि उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन
लेखक परिचय
श्री. दिलीपराव देशमुख बारडकर नामवंत कीटक तज्ज्ञ. हिंदुस्थान सिबा गायगी इंडिया लिमिटेड या उद्योग संस्थेतून प्रांतीय संशोधन अधिकारी म्हणून निवृत्त. बारड येथील स्वतःच्या शेतीत सेंद्रिय पद्धतीने विविध पिकांचे उत्पादन व संशोधन. विविध शेतपिकांवरील किडी व त्यांचा प्रसार, किडींमुळे होणारे रोग, प्रतिबंधात्मक रासायनिक कीडनाशकांमध्ये वापरली जाणारी घातक रसायने यांचे संशोधन रेसिड्यू फ्री अँड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडेरेशन संस्थेचे सल्लागार म्हणून कार्यरत. अनेक नियतकालिके व मासिकांमध्ये लिखाण शेतीमित्र, सिंचन मित्र अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित
दूरचित्रवाणी व आकाशवाणीवर अनेक मुलाखती व शेतकऱ्यांना सल्ला.