Kahani Koshimbirichi

BK00516

New product

महाराष्ट्रीय भोजनात कोशिंबीर, रायत्याला पौष्टिकतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पण कोशिंबिरी, रायते, भरीत फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात केले जाते. नावे वेगवेगळी, चवी वेगवेगळ्या.. पण पौष्टिकता मात्र तीच.

More details

₹ 149 tax incl.

More Info

* 'अन्न हे पूर्णब्रह्म' असे म्हटले जाते. मात्र शरीराला आवश्यक ऊर्जा देणारे कोणते अन्न, किती प्रमाणात व कधी खाल्ले पाहिजे, याचेही आरोग्यदायी असे शास्त्र आहे. संपूर्ण देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील खानपान पद्धतींचा विचार केला, तर महाराष्ट्रीय भोजन पद्धती उजवी ठरते. हे भोजन आणि ते वाढण्याची पद्धत आरोग्यशास्वाच्या नियमांनुसार अतिशय योग्य आहे. महाराष्ट्रीय भोजनात कोशिंबीर, रायत्याला पौष्टिकतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पण कोशिंबिरी, रायते, भरीत फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात केले जाते. नावे वेगवेगळी, चवी वेगवेगळ्या.. पण पौष्टिकता मात्र तीच.

* न शिजवलेल्या कच्च्या कंदभाज्या, पालेभाज्या किंवा फळांपासून तयार होणाऱ्या कोशिंबिरी, व रायत्यांना आधुनिक काळात जोड मिळाली आहे, ती सॅलडची. आधुनिक काळातील डाएटमध्ये विविध प्रकारच्या सॅलडचा समावेश आवर्जून केला जातो.

* आहारशास्त्राच्या दृष्टीने पौष्टिक, आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने पूरक आणि पाकशास्त्राच्या दृष्टीने अतिशय चवदार, रसदार अशा देशविदेशांतील कोशिंबिरी, रायते आणि सॅलड व सॅलड ड्रेसिंगचे असंख्य प्रकार व पद्धतींचा समावेश या पुस्तकात केला आहे.

* कोशिंबीर, रायते, भरीत, अशा पदार्थांना मराठीत तोंडीलावणे अशी सुयोग्य संज्ञा आहे. ही तोंडीलावणी जेवणात लज्जत निर्माण करतात. अशा चवदार कोशिंबिरी, भरीत, रायत्यांची जन्मकथा कोणती, आणि आधुनिक काळातील सॅलड नावाच्या स्वतंत्र खाद्यप्रकाराने या तोंडीलावण्यांच्या बरोबरीने खवय्यांची क्षुधातृप्ती कशी केली आहे, याची रंजक कथा कहाणी.. कोशिंबीर आणि सॅलडची

Reviews

Write a review

Kahani Koshimbirichi

Kahani Koshimbirichi

महाराष्ट्रीय भोजनात कोशिंबीर, रायत्याला पौष्टिकतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पण कोशिंबिरी, रायते, भरीत फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात केले जाते. नावे वेगवेगळी, चवी वेगवेगळ्या.. पण पौष्टिकता मात्र तीच.

Customers who bought this product also bought: