Shyamchi Aai

BK00395

New product

सहनशीलता, सहकार्य, आपलेपणा, इतरांसाठी काही करण्याची वृत्ती अशा अनेक गुणांबाबत आपल्या मुलाला, श्यामला विचार करायला लावणारी त्यागमूर्ती आई 'श्यामची आई' या अत्यंत गाजलेल्या पुस्तकात साने गुरुजींनी रंगवली आहे.

More details

₹ 180 tax incl.

More Info

पुस्तकाबद्दलची माहिती 

सहनशीलता, सहकार्य, आपलेपणा, इतरांसाठी काही करण्याची वृत्ती अशा अनेक गुणांबाबत आपल्या मुलाला, श्यामला विचार करायला लावणारी त्यागमूर्ती आई 'श्यामची आई' या अत्यंत गाजलेल्या पुस्तकात साने गुरुजींनी रंगवली आहे. खरेतर, साने गुरुजींना घडवणाऱ्या त्यांच्या आईचे, यशोदाबाईंचेच हे चरित्र आहे. इतक्या वर्षांनंतरही सर्वाधिक खपाच्या दर्जेदार पुस्तकांमध्ये या पुस्तकाचा समावेश होतो, यातच या चरित्राचे यश सामावलेले आहे.   

लेखक साने गुरुजी यांच्याबद्दल 

स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या साने गुरुजींनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर देशात सुरु असलेल्या सत्याग्रह चळवळीमध्ये सहभाग घेतला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक विषमता नष्ट व्हावी या उद्देशाने पंढरपूरचे मंदिर सर्व जातीधर्मांसाठी खुले करण्याकरिता त्यांनी आमरण उपोषण केले. साधना साप्ताहिक सुरु करून त्यांनी आपले विचार जनतेपर्यंत पोचवले. त्यांनी तब्बल १३५ पुस्तके लिहिली. बहुसंख्य पुस्तके लहान मुलांसाठी असली तरी भारतीय संस्कृती, इस्लामी संस्कृती, अशा पुस्तकांमधून त्यांच्यातील विचारवंताचे दर्शन होते.     

Reviews

Write a review

Shyamchi Aai

Shyamchi Aai

सहनशीलता, सहकार्य, आपलेपणा, इतरांसाठी काही करण्याची वृत्ती अशा अनेक गुणांबाबत आपल्या मुलाला, श्यामला विचार करायला लावणारी त्यागमूर्ती आई 'श्यामची आई' या अत्यंत गाजलेल्या पुस्तकात साने गुरुजींनी रंगवली आहे.

Customers who bought this product also bought: