BK00602
New product
जन्मतः हृदयरोगाने ग्रासलेली एक तरुणी जिने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे जीवनात पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगली, अशा ज्योती मुंगसेची ही जीवन कहाणी म्हणजे 'सुहृदय ज्योती' हे पुस्तक!
Warning: Last items in stock!
Availability date:
Suhrud Jyoti by Dr. Pratibha Deshpande
जन्मतः हृदयरोगाने ग्रासलेली एक तरुणी जिने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे जीवनात पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगली, अशा ज्योती मुंगसेची ही जीवन कहाणी म्हणजे 'सुहृदय ज्योती' हे पुस्तक!
Recipient :
* Required fields
or Cancel
* ज्योतीने आपल्या जन्मजात आजाराचे भांडवल न करता नृत्य, ट्रेकिंग, कुकिंग हे आपले छंद जोपासले. 'येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं!' हे आयुष्याचे सूत्र ठरवून ज्योती जीवन कशी जगली, याचे कथन म्हणजे हे पुस्तक!
*मरण आज येईल की उद्या येईल; हे सांगता येत नसताना मरणाला हुलकावणी देत ४६ वर्षांचे आयुष्य ज्योती जगली; ते केवळ तिच्या सकारात्मक विचारांवर! हे तिचे प्रेरणादायी आयुष्य येथे मांडले आहे.
*कुटुंबीय, शिक्षक, मैत्रिणी, डॉक्टर या सर्वांना तिने आपलेसे केले. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हसत हसत आयुष्य कसे जगावे याचा आदर्शच तिने घालून दिला.
* अभिनेते स्व. डॉ. श्रीराम लागू, दीपा लागू यांची ती मानस कन्या होती! प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ तिची जगण्याची जिद्द पाहून तिला 'लढवय्या' म्हणत! तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका नसीमा हुरजूक ह्या ज्योतीच्या स्फूर्तिस्थान होत्या! या सर्वांचे हृदयस्पर्शी वर्णन यामध्ये आहे.
*आपल्यासारख्याच हृदयरोगाने ग्रस्त असणाऱ्यांना मदत व्हावी, यासाठी 'हृदय-ज्योत' संस्थेची तिने स्थापना केली. दु:ख, वेदना बाजूला सारून आनंदी आयुष्य ज्योती जगली! खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणा देणारा तिचा जीवनप्रवासाविषयीचे हे पुस्तक!
* डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी सहज, सुंदर शब्दांत ज्योतीचे आयुष्य चितारले आहे.
डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी 'समुपदेशन मानसशास्त्र' (Counseling Psychology) या विषयात एम.ए. केले आहे. यासंबंधी ऑस्टिन, प्रिन्सटन आणि स्टॅनफोर्ड या आंतराष्ट्रीय विद्यापीठांमधून अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत. समुपदेशन हे डॉ. प्रतिभा यांचे आवडते कामअसल्याने त्यांनी 'मानसशास्त्रीय प्रथमोपचार' यामध्ये पीएच.डी. संपादन केली. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित ११ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Pratibha Deshpande |
Language | Marathi |
ISBN | 9789395139038 |
Binding | Paperback |
Pages | 288 |
Publication Year | 2022 |
Dimensions | 5.5 x 8.5 |