Vividh Pikanche Perniyogya Waan by Diliprao Deshmukh Baradkar

BK00624

New product

सेंद्रिय शेतीस पूरक असणाऱ्या बियाणांची विस्तृत माहिती 'विविध पिकांचे पेरणीयोग्य वाण' या पुस्तकात सेंद्रिय व बायोडायनामिक शेती पद्धतीचे  अभ्यासक लेखक दिलीपराव देशमुख बारडकर यांनी दिली आहे.  

More details

Warning: Last items in stock!

₹ 340 tax incl.

More Info

*महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांची प्रकाशने, शास्त्रज्ञांचे प्रकाशित लेख, शेतकर्‍यांच्या यशोगाथा या सर्वांचा आधार घेऊन पिकांच्या सुधारित, सरळ, संकरित वाणांची व पेरणीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

*नगदी, तृणधान्य, तेलबिया, कडधान्य, भाजीपाला, मसाला पिके, फळझाडे, फूलझाडे, औषधी वनस्पती व चारापिकांसह १६३ वाणांची उपयुक्त माहिती यामध्ये दिली आहे.

*पिकांच्या पेरणीयोग्य वाणांची माहिती आणि त्यासाठी संपर्काचे पत्तेही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिले आहेत. 

*गेल्या ८० वर्षांपासून जगातील सुमारे ७० देशांतील शेतकरी पेरणीसह सर्व शेतीकामासाठी वापरत असलेल्या 'बायोडायनामिक कॅलेंडर'ची माहिती यामध्ये दिली आहे.

*शेतकरी, कृषी अभ्यासक, विद्यार्थी आणि शेतीची आवड असणारे सामान्य वाचक यांना उपयुक्त ठरणारे पुस्तक! 

लेखक दिलीपराव देशमुख बारडकर हे हिंदुस्थान सिबागागी इंडिया लिमिटेड उद्योगसंस्थेतून प्रांतीय संशोधन अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत.महाराष्ट्र ऑर्गनिक फार्मिंग फेडरेशन (MOFF), पुणे, महाराष्ट्र या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. सेंद्रिय शेती व बायोडायनामिक पद्धतीचे ते खंदे  प्रचारक आहेत. प्रतिबंधात्मक कीडनाशकांमध्ये वापरली जाणारी रसायने यांचे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश व तामिळनाडू या राज्यांमध्ये  प्रदीर्घ काळ संशोधन त्यांनी केले आहे. रेसिड्यू फ्री अ‍ॅण्ड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन संस्थेचे सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. विविध  यशस्वी कृषिप्रयोगांवर आधारित मार्गदर्शनपर नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जागतिक कृषी परिषद, २०१९मध्ये कृतिशील सहभागाबद्दल  प्रशस्तिपत्र, त्याशिवाय शेतीमित्र, सिंचन मित्र, सेंद्रिय शेती शिल्पकार, स्व. शंकरराव किर्लोस्कर पारितोषिक, रेसिड्यू फ्री अ‍ॅण्ड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशनचे प्रशस्तिपत्र अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. 

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDiliprao Deshmukh Baradkar
LanguageMarathi
ISBN9789395139236
BindingPaperback
Pages202
Publication Year2022
Dimensions7 x 9.5

Reviews

Write a review

Vividh Pikanche Perniyogya Waan by Diliprao Deshmukh Baradkar

Vividh Pikanche Perniyogya Waan by Diliprao Deshmukh Baradkar

सेंद्रिय शेतीस पूरक असणाऱ्या बियाणांची विस्तृत माहिती 'विविध पिकांचे पेरणीयोग्य वाण' या पुस्तकात सेंद्रिय व बायोडायनामिक शेती पद्धतीचे  अभ्यासक लेखक दिलीपराव देशमुख बारडकर यांनी दिली आहे.  

Products related to this item