Sale! Goshta Paishapanyachi

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

BK00641

New product

आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.

More details

AVAILABLE

₹ 299 tax incl.

More Info

आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे.

प्रफुल्ल वानखेडे हे अनेक कंपन्यांचे संस्थांपक-अध्यक्ष आहेत. ते पुस्तकप्रेमी आहेत. वाचनसंस्कृती जोपासणे आणि वाढविणे यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. ट्विटरवर त्यांचे असंख्य युथ फालोअर्स आहेत. अनोख्या पद्धतीने मूल्ये जपून व्यावसायिक यश मिळविण्याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता ते मुख्यत: ओळखले जातात. या पुस्तकाच्या लेखांमधून त्यांनी स्वत:ला आलेल्या अनुभवांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यांना भेटलेल्या माणसांकडून, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधून त्यांनी स्वत: कोणती कौशल्ये आणि गुण आत्मसात केली आहेत, हे त्यांनी यामध्ये उलगडले आहे.

प्रफुल्ल वानखेडे यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या शब्दांमध्ये विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. मराठी माणसांमध्ये असलेला मार्केटिंगचा न्यूनंगड आणि त्यातून उद्योग-व्यवसायाची संस्कृती रुजविण्यात येणारे अडथळे आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग त्यांनी सुचविले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात उच्च शिक्षणाचे वळण येते. त्यातून युवकांच्या आयुष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटणार असतो. त्याविषयी यशाची गुरुकिल्ली त्यांनी दिली आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांमुळे आपण कसे घडत जातो, त्याचे महत्त्वही त्यांनी माणुसकीची श्रीमंती यातून पटवून दिले आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहण्याची सूचनाही ते करतात. बचतीमधील महिलांचे स्थान याविषयी दिलेली माहिती प्रेरणादायी आहे. आर्थिक साक्षरता हा गेल्या काही वर्षातील परवलीचा शब्द झाला आहे. त्यातून गरजांचे मूल्यांकन आपल्याला करता येते आणि आपले पुढचे पाऊल कोणत्या दिशेने टाकायचे याचा निर्णय घेता येतो. प्रगतीमध्ये इमोशनल आणि इंटेलिजेंट कोशंट महत्त्वाचा असल्याचे मत अनेकजण मांडतात. मात्र, फायनांशिअल कोशंटशिवाय हे सर्व व्यर्थ असल्याचे मत त्यांनी मांडून अभ्यासाची एक नवी दिशा खुली केली आहे आणि पैशापाण्याच्या गोष्टींना नवा आयाम मिळवून दिला आहे.

Be it your intellect or money, only if it is used in the right place it has value. At the same time values play an important role in life, values guide us to take the right path to success. So money and values ​​when put to right actions results in happiness. Together it can help us achieve the goals set in life. In that regard, this book will be a great guide to achieve financial freedom and happiness. New opportunities, financial literacy, importance of hard work and smart work, timely detection of potential hazards, investment & savings strategy and beyond all these, managerial skills become important. This book is a guide for all that.

Prafulla Wankhede is the founder-chairman of many companies. He is an avid reader, loves books. His contribution to make people inculcate a habit of reading books is valuable. He has thousands of youth following him on Twitter. He is mainly known for providing guidance on attaining professional success by upholding values ​​in an innovative manner. In this book, he has given an account of his experiences, of other successful people and valuable learning from various books. In this, he has revealed what skills and qualities he himself has acquired over years to be successful.

Prafulla Wankhede has shed light on various topics in easy, simple and fluent manner. He has laid out ways of marketing which is essential for success. He has emphasised the importance of higher education as an important means to solve the problem of livelihood for youth. He has given the key to success in academics. In the chapter the Importance of Human Wealth, he has also shown the importance of how we are shaped by the people around us. He also advises us to be cautious while doing financial transactions. The importance of Women as financial decision-makers is an important step towards inclusion. Financial literacy has become the buzzword of the last few years. It allows us to assess the needs and decide which direction to take our next step. Many believe that EQ and IQ are important in progress. However, he has opened a new branch of study by suggesting that all this is useless without financial quotient and has given a new dimension to the matter of money and success.

स्वतः प्रथितयश उद्योजक असणारे प्रफुल्ल वानखेडे पुस्तकप्रेमाने भारलेले असून 'लेट्स रीड' सारख्या ग्रंथ चळवळीतून वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी अथक कार्यरत आहेत. त्यांची ही 'गोष्ट पैशापाण्याची प्रत्येक वाचकामध्ये अर्थविषयक जागरूकता निर्माण करत आर्थिक नियोजनातून आनंदी जगण्याचा मार्ग दाखवेल असा विश्वास आहे.

- पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ

प्रत्येकाने संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे. जेव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासेल, तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातल्या गोष्टी वाचा. त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, नवी उमेद मिळेल.
- (प्रस्तावनेतून) आनंद देशपांडे, संस्थापक, पर्सिस्टंट

माणूस कष्ट, व्यवसाय, गुंतवणूक करून पैसे कमावू शकतो. मात्र, हा पैसा तात्पुरता आहे; टिकून राहते ती गुंतवणूक माणसांमधली.या गुंतवणुकीचे रिटर्न पैशांत मोजता येत नाहीत. पैशातल्या आणि माणसांतल्या दोन्ही गुंतवणुकींचे महत्त्व हळुवारपणे समजावणारे पुस्तक,
- चेतना गाला सिन्हा, संस्थापक अध्यक्ष, माणदेशी बँक आणि फाऊंडेशन

प्रफुल्ल वानखेडे यांचं 'गोष्ट पैशापाण्याची आपल्याला खऱ्या जगात नेणारं पुस्तक आहे.
पैशासोबत माणसं, आरोग्य, ज्ञान, विज्ञान या गोष्टींचीही किंमत सांगणारं पुस्तक, प्रफुल्ल यांचं हे पहिलंच पुस्तक, अनेक चांगले पायंडे पाडणारं मराठी पुस्तक ठरणार आहे.
- अरविंद जगताप, लेखक आणि दिग्दर्शक

नव्या वाटा शोधणाऱ्या, स्वतंत्र व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या, बदलत्या परिस्थितीमध्ये स्वतची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावेच असे पुस्तक,
- हणमंतराव गायकवाड, चेअरमन आणि एमडी, बीव्हीजी ग्रुप

'व्यवहार' या एका शब्दानं आपलं आयुष्य व्यापलेलं आहे. नातेसंबंधांपासून ते आर्थिक संबंधांपर्यंत सगळीकडेच हा शब्द वेगवेगळ्या अर्थछटा घेऊन येत असतो. व्यवहाराची सांगड शहाणपणाशी घालणं ज्याला जमतं तोच आयुष्यातली अवघड कोडी सोडवू शकतो.
- श्रीकांत बोजेवार, निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPrafulla Wankhede
LanguageMarathi
ISBN9789389834840
BindingPaperback
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Grade 
09/13/2022

1

काष्टी ता श्रीगोंदा

    Grade 
    09/10/2022

    गोष्ट पैशापाण्याची

    अतिशय उपयुक्त असे पुस्तक. मराठीत आर्थिक साक्षरता अतिशय सोप्या भाषेत गोष्टीरूप सांगितली आहेत. प्रत्येक लेख काहीतरी नवीन तर शिकवतोच पण आत्मनिरिक्षण करण्यास भाग पाडतो. तेव्हा आपल्या संग्रही हे असावेच...

      Grade 
      09/09/2022

      Best financial advises in common man's language

      Prafulla is renowned businessman, founded and nourished his business on own without any financial and family background and support. He leads lot of social causes like 'let's read foundation' and so many. He guides newcomers in business and corporate world with his immense experience and knowledge.

      The book is written in such a language which can be understood by common people. Those are really helpful in day to day life and financial decisions.
      I recommend this book for every person to take financial decisions.....!!!

      Congratulations Prafulla in the new role and journey as an author.

        Grade 
        09/09/2022

        आता वाट नाही पाहावी लागणार

        आता वाट नाही पाहावी लागणार

        शनिवार च्या थ्रेड ची किंवा सकाळ मधील लेखाची
        पुस्तक वाचाययला मिळणार आता
        पैशापाण्याच्या रोमांचक गोष्टी !

          Grade 
          09/09/2022

          समृद्ध अनुभवांची शिदोरी

          हे पुस्तक अनेकांसाठी सेल्फ हेल्प / लाईफहॅक ठरणार आहे. हा प्रवास ट्विटर ते स्तंभ लेखन असा सुरू होऊन आता या सर्व प्रवासाचं कलेक्टिव्ह आलं आहे. लेखक आपले दर्जेदार अनुभव सांगताना पहिल्याच वाक्यापासून वाचकाच्या मनावर आरूढ होऊन जातात आणि प्रत्येक पानागणिक अनुभवसंपन्नतेची शिदोरी उघडून एक एक अनुभव उलगडून सांगत मनावर जे गारुड करतात, तो अनुभव थोडक्यात मांडणे फार अवघड आहे हे नक्की.. हे पुस्तक एकदा ते अनेकदा वाचताना वाचकांसाठी लाईफहॅक ठरू शकेल हे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो.. अर्थाचे अर्थ सोप्या शब्दांत सांगणारं हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावं असं आहेच, वाचून झाल्यावर कोणी स्वतःमध्ये कसे आणि किती बदल कळत नकळत केले हे उमजून घेणे हा देखील अभूतपूर्व प्रवास ठरणार आहे..

            Write your review!

            Write a review

            Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

            Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

            आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.

            Customers who bought this product also bought: