Kaju Aayat-Niryat

BK00605

New product

भारत हा जागतिक काजू अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक आहे. तर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी काजू शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे, त्यामुळे यासंबंधी आवश्यक असलेली माहिती काजू आयात-निर्यात या पुस्तकात लेखक डॉ. परशराम पाटील यांनी आकडेवारीच्या आधारे स्पष्ट केली आहे.

More details

₹ 199 tax incl.

More Info

*काजूची निर्यात, प्रक्रिया आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे पुस्तकात काजू निर्यातीसाठी उपयोगी पडणाऱ्या निर्यात शुल्क, पायाभूत सुविधा, उत्पादनाची किंमत, प्रक्रिया, आयात, उत्पादन, स्पर्धा अशा विविध घटकांचे विश्लेषण केले आहे.
*वर्षानुवर्षे निर्यातीमुळे भारतातील काजू उद्योगाचा विकास होत आहे. तथापि, गेल्या काही वर्षांपासून भारतातील काजू निर्यात कमी झाली आहे, ज्याचा भारतीय काजू उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. त्या आनुषंगाने पुस्तकात काजू निर्यात कमी होण्याची नेमकी कारणे नमूद केली असून काजू निर्यात सुधारण्यासाठी विविध उपायही सुचवले आहेत.
काजू उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे उपयोगी पुस्तक आहे.
काजू निर्याती संबंधातील देश-विदेशातील नियम, दर, त्याची स्पर्धात्मकता यांची एकत्रित माहिती हे पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
भारतीय काजू उद्योगाला चालना मिळावी यासाठी सरकारी पातळीवर अनेक योजना राबविल्या जात आहेत. काजू व्यवसायात स्टार्टअपच्या विविध संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे नव उद्योजकांनाही याचा पुस्तकाचा फायदा होऊ शकेल.

लेखकाविषयी माहिती : डॉ. परशराम जकाप्पा पाटील हे कृषी अर्थशास्त्रज्ञ, लेखक आणि फेलो, NMML ('नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी'), भारत सरकार.

आशियाई विकास बँक, संयुक्त राष्ट्र हवामान बदल प्रारूप, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, कृषी प्रक्रिया केलेले अन्न आणि निर्यात विकास प्राधिकरण, नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, स्टार्ट-अप इंडिया यांसारख्या राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय संस्थांचे माजी सल्लागार/सल्लागार आहेत. ग्रामीण विकास ट्रस्ट, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, ग्लोबल फोरम फॉर रुरल अॅडव्हायझरी
सर्व्हिसेस, स्वित्झर्लंड, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, ब्यूरो व्हेरिटास, नैसर्गिक संसाधन संस्था, आणि फ्लोरी अॅग्रो एक्सपोर्ट्स एलएलपीचे अध्यक्ष आहेत. कृषी बाजार आणि मूल्य साखळींचा विकास, कृषी व्यापार उदारीकरण आणि जागतिक व्यापार संघटनेतील वाटाघाटी, विकासशील देशांचे हित, वनलेखा, हवामान बदल अशा विविध विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे. डॉ. पाटील भारत सरकार आणि खासगी क्षेत्राला कृषी अर्थशास्त्र, हवामान बदल यांवर विश्लेषण आणि धोरणात्मक सल्ला देत असतात.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Parsharam Patil
LanguageMarathi
ISBN9789395139175
BindingPaperback
Pages106
Publication Year2022
Dimensions7 x 9.5

Reviews

Write a review

Kaju Aayat-Niryat

Kaju Aayat-Niryat

भारत हा जागतिक काजू अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक आहे. तर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी काजू शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे, त्यामुळे यासंबंधी आवश्यक असलेली माहिती काजू आयात-निर्यात या पुस्तकात लेखक डॉ. परशराम पाटील यांनी आकडेवारीच्या आधारे स्पष्ट केली आहे.