Molachi Thev

BK00634

New product

‘मोलाची ठेव’ या कृष्णा पाटील यांनी लिहिलेल्या कथासंग्रहात साधारण २५ कथा आहेत. लेखकाने मनोगतात म्हटल्याप्रमाणे त्यांना स्वतःला एक वाचक म्हणून काल्पनिक आणि अद्भुत जगाच्या कथांमध्ये रस नाही. त्यामुळे या संग्रहातील कथांमध्ये अतिशय कमी काल्पनिक अंश असून यातील सर्व कथा या बहुतकरून लेखकाला आलेले अनुभव, पाहिलेल्या वा भेटलेल्या व्यक्ती, अनुभवलेले प्रसंग यातून जन्माला आल्या आहेत.

More details

₹ 228 tax incl.

More Info

‘मोलाची ठेव’ हा लेखक कृष्णा पाटील यांचा दुसरा कथासंग्रह असून लेखकाने आपल्या अनुभवसमृद्ध जगण्यातून या कथा शब्दबद्ध केल्या आहेत. या कथा आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडीतून जन्म घेत असल्याने समकालीन समाजजीवनाचा एक कथारुपी दस्तऐवजच यातून तयार होतो आहे.
सत्य प्रसंगातून आणि अनुभवातून जन्माला येणाऱ्या अशा प्रकारच्या कथा ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी हा कथासंग्रह म्हणजे एक पर्वणी आहे.

लेखकाविषयी : लेखक कृष्णा पाटील हे व्यवसायाने वकील असून ते तासगाव जि. सांगली येथे वास्तव्यास असतात. त्यांना सत्य प्रसंगावर आधारित कथा लिहायला विशेष आवडतात. हा त्यांचा दुसरा कथा संग्रह आहे. त्यांचा पहिला कथासंग्रह, ‘वाटणी’ २०१७ साली प्रकाशित झाला होता. त्या कथा संग्रहालाही वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.  

Features

PublisherSakal Prakashan
AuthorKrushna Patil
LanguageMarathi
ISBN978-93-95139-31-1
BindingPaperback
Pages156
Publication Year2022
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Molachi Thev

Molachi Thev

‘मोलाची ठेव’ या कृष्णा पाटील यांनी लिहिलेल्या कथासंग्रहात साधारण २५ कथा आहेत. लेखकाने मनोगतात म्हटल्याप्रमाणे त्यांना स्वतःला एक वाचक म्हणून काल्पनिक आणि अद्भुत जगाच्या कथांमध्ये रस नाही. त्यामुळे या संग्रहातील कथांमध्ये अतिशय कमी काल्पनिक अंश असून यातील सर्व कथा या बहुतकरून लेखकाला आलेले अनुभव, पाहिलेल्या वा भेटलेल्या व्यक्ती, अनुभवलेले प्रसंग यातून जन्माला आल्या आहेत.

Customers who bought this product also bought: