Prapat

BK00657

New product

अल्प शब्दात कवीची मानसिक आंदोलने टिपण्याची शक्ती कवितेत असते. त्यामुळेच कमी शब्द हे कवितेचे सामर्थ्य ठरते. ‘प्रपात’ हा कवी, लेखक प्रणव लेले यांचा दुसरा कवितासंग्रह असून यामध्ये एकूण सत्तर कविता आहेत. 

More details

₹ 125 tax incl.

More Info

साहित्य मग ते कोणत्याही प्रकारातील असो त्यामध्ये लेखकाच्या किंवा कवीच्या भवतालचे एक प्रतिबिंब सतत दिसत राहते. कवी लेले यांची कविताही याला अपवाद नाही. आपल्या आजूबाजूची परिस्थिती विषण्ण करणारी, कोणत्याही विचारी माणसाला संभ्रमात टाकणारी आहे. या परिस्थितीतून कवीच्या मनात निर्माण होणारा कल्लोळ मांडणाऱ्या या कविता अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीवर समयोचित भाष्य करतात.


विषण्ण करणाऱ्या अशा परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी अध्यात्माऐवजी आपण कलेचा मार्ग स्वीकारला असे श्री. प्रणव लेले प्रस्तावनेत सांगतात. देशातील वाढती धार्मिक दांभिकता, पैशाचे वाढते महत्त्व, बुवाबाजी, युद्ध या आणि अशा अनेक विषयांवर निरीक्षणातून लिहिलेल्या कविता या संग्रहात आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPranav Lele
LanguageMarathi
ISBN9789395139496
BindingPaperback
Pages80
Publication Year2022
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Prapat

Prapat

अल्प शब्दात कवीची मानसिक आंदोलने टिपण्याची शक्ती कवितेत असते. त्यामुळेच कमी शब्द हे कवितेचे सामर्थ्य ठरते. ‘प्रपात’ हा कवी, लेखक प्रणव लेले यांचा दुसरा कवितासंग्रह असून यामध्ये एकूण सत्तर कविता आहेत. 

Customers who bought this product also bought: