Shunya by Sri M

BK00695

New product

श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.

More details

₹ 239 tax incl.

-20%

₹ 299 tax incl.

More Info

केरळमधील एका छोट्या, शांत उपनगरात तो अचानक कुठूनतरी अवतरला. तो स्वतःला 'शून्य' म्हणवतो, झिरो. परंतु तो नक्की आहे तरी कोण?

एक वेडसर मनुष्य? काळी जादू करणारा मांत्रिक? कोणी एक लुच्चा? की एक अवधूत, एक साक्षात्कारी महापुरुष?

सामी नावाने ओळखली जाणारी ही व्यक्ती एका स्थानिक ताडी विक्री केंद्राच्या पाठीमागच्या अंगणातील छोट्या झोपडीमध्ये राहू लागते. तिथे ती व्यक्ती बोधकथा सांगते, आशीर्वाद देते, शिव्याशाप देते, काळ्या चहाचे असंख्य पेले रिचवते आणि सर्वार्थाने मुक्त असे आयुष्य जगते. क्वचित प्रसंगी आपल्या बांबूच्या जुन्या बासरीतून मन मोहून टाकणारी संगीतनिर्मिती करते.

कालांतराने, ज्या गूढ प्रकारे तो अवतरला तशाच पद्धतीने एका नवीन कालखंडाची मुहूर्तमेढ रचून एक नवा साहसी मार्ग निर्माण करून 'शून्य' एकाएकी नाहीसा होतो.

श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी 'शून्य' ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता, तसेच वास्तव आणि भ्रम गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते. सखोल ज्ञानावर आधारित अतिशय संयत असे हे कथाकथन आपल्याला 'शून्या' च्या प्रांतात घेऊन जाते. शून्यतेच्या अशा एका विश्वात जेथे गहिरी आणि चिरस्थायी शांतता सदैव नांदत असते; ही असीम शांतताच सर्व गोष्टींचे उगमस्थान आणि शेवट आहे.

The first novel by Sri M is a meditation on the void, which collapses the wall between reality and make-believe, the limited and the infinite. With it’s spare storytelling and profound wisdom, It leads us into the realm of ‘Shunya’ the nothingness of profound and lasting peace. 
The beginning and end of all things.

श्री एम (एक योगी, जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू, लेखक, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ)

त्यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपुरम येथे ६ नोव्हेंबर १९४९ रोजी झाला. एक लहान मूल ते एक समकालीन योगी बनण्यापर्यंतचा त्यांचा परिवर्तनात्मक प्रवास हा, आपले एकमेव ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी शिस्त आणि समर्पण यांचे मूर्तिमंत उदाहरण असलेली एक चित्तवेधक कथा आहे.

गुरू श्री महेश्वरनाथ बाबाजी यांच्या महानिर्वाणानंतर काही वर्षांनी त्यांना त्यांच्या गुरूंचे आध्यात्मिक कार्य पुढे नेण्याचा आदेश मिळाला आणि त्यांनी १९९८ सालापासून लोकांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यातूनच पुढे 'द सत्संग फाउंडेशन' ह्या संस्थेची स्थापना झाली.

जानेवारी २०२० मध्ये श्री. एम. यांना आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी भारतातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक अशा 'पद्म भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री एम यांना विविध विषयांवर व्याख्यान देण्यासाठी जगभरातील अनेक नावाजलेल्या संस्थांमध्ये आमंत्रित करण्यात येते.

सर्वांना उत्तम आयुरारोग्य लाभावे ह्या हेतूने प्राचीन योग विज्ञानाचा सर्वत्र प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून सत्संग फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत भारत योग विद्या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

नुकतीच त्यांची आयआयटी, दिल्ली येथील NRCVEE (National Research Centre for Value Education in Engineering) विभागात साहाय्यक संलग्न प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री एम हे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. लोकांना मार्गदर्शन करत आणि सत्संग फाऊंडेशनचा कार्यभार सांभाळत ते साधे जीवन जगतात. सध्या ते बंगलोरपासून तीन तासांच्या अंतरावर आंध्रप्रदेशातील मदनपल्ले येथे राहतात.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSri M
LanguageMarathi
ISBN9789395139656
BindingPaperback
Pages200
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Shunya by Sri M

Shunya by Sri M

श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.

Customers who bought this product also bought: