Being Bhausaheb

BK00612

New product

‘सकाळ’ चे एक संचालक भाऊसाहेब पाटील यांचे ८ ऑक्टोबर २०२० रोजी पुण्यामध्ये दु;खद निधन झाले. त्यावेळी ते संचालक म्हणून कार्यरत होते आणि हॉस्पिटलमध्ये असतानाही पुढच्या कामांची आखणी करत होते. १९८७ ते २०२० या काळात सकाळमध्ये विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या भाऊसाहेबांच्या कारकीर्दीचा आणि सकाळच्या पलीकडे ते जे प्रेरणादायी आयुष्य जगले त्याचा लेखाजोखा या चरित्रात्मक पुस्तकातून घेण्यात आला आहे. 

More details

₹ 500 tax incl.

More Info

कोल्हापूरजवळील बामणी नावाच्या गावात जन्मलेले भाऊसाहेब शिक्षणासाठी गावातून बाहेर पडले आणि शिक्षण संपल्यावर १९८७ साली कोल्हापूर सकाळमध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून रुजू झाले. २०२० साली मृत्युसमयी ते सकाळच्या महत्त्वाच्या संचालकांपैकी एक होते. ‘सकाळ’ साठी त्यांनी आपलं सर्वस्व झोकून दिलं होतं.
तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागल्यानंतर इतर क्षेत्रांप्रमाणेच वृत्त पत्रकारितेत आणि छपाईतंत्रात आमुलाग्र बदल झाले. बदलत्या काळात आपला टिकाव लागण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान अवलंबणे सर्वांनाच आवश्यक होते आणि या काळात भाऊसाहेब पाटील विविध तांत्रिक पदांवर काम करत अनेक प्रकारचे नवे तंत्रज्ञान ‘सकाळ’मध्ये आणले, ते रुजवले. यासाठी अनेक नवे लोक ‘सकाळ’शी जोडून घेतले, अनेकांना यातून रोजगार मिळाला आणि बदलत्या काळाशी हात करायला सकाळ सज्ज झालं.
ही तंत्रसज्जता ‘सकाळ’मध्ये रुजवण्यात भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी हे बदल नेमके कसे हेरले, घडवले याबद्दल तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. प्रस्तावनेत ‘सकाळ’च्या अभिजित पवार यांनी भाऊसाहेबांबद्दल आणि या पुस्तकाबद्दल अगदी नेमक्या शब्दात मांडलं आहे. ते म्हणतात: ‘हे पुस्तक म्हणजे भाऊसाहेबांचं कौतुक नाही, गुणगान तर नाहीच नाही; तर ही एका स्वयंभू वारशाची कहाणी आहे. या कहाणीतून भाऊसाहेबांच्या अनेक गुणांचा परिचय होईल. त्यातून काय बोध घेता येईल हे समजावं, या उद्देशानं हे पुस्तक जन्माला आलं आहे. यातील काही गुण तुमच्यापाशी असतीलही, पण भाऊसाहेबांच्या निमित्तानं या गुणांचा जागर करता येईल, हा विचार मनात सुरू झाला, तर तो नव्या ऊर्जेला जन्म देईल.’

Features

PublisherSakal Prakashan
AuthorAmruta Desarda
LanguageMarathi
ISBN9789395139359
BindingHardcover + Jacket
Pages175
Publication Year2023
Dimensions7 x 9

Reviews

Write a review