Manachya Aarshat

BK00631

New product

लेखिकेला आयुष्यात आलेले हे अनुभव जसे तिला काही महत्त्वाचं शिकवून गेले तसेच ते वाचक म्हणून आपल्या साऱ्यांचे जीवनही समृद्ध करतात. या पुस्तकात एक व्यावसायिक म्हणून लेखिकेला आलेले अनुभव मांडताना तिच्याकडे येणाऱ्या ग्राहक वर्गाबद्दल आणि सामाजिक परिस्थितीबद्दल आपल्याला बरीच रंजक माहिती मिळते. या पुस्तकामध्ये काही ठिकाणी काढलेली चित्र शाब्दिक आशयाला साजेशी आणि बोलकी आहेत. 

More details

₹ 240 tax incl.

More Info

प्रिया खैरेपाटील यांनी लिहिलेल्या या लेख संग्रहातील जवळपास सर्वच लेख त्यांना वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनुभवांवर आधारित आहेत. व्यवसायाने ब्युटीशिअन असलेल्या खैरेपाटील यांनी १९९३ साली म्हणजे जवळपास ३० वर्षांपूर्वी आपल्या घराच्या छोट्याशा खोलीत आपला व्यवसाय सुरू केला.
व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आलेले विविध अनुभव शब्दबद्ध करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्या लिहू लागल्या. याबाबत त्या म्हणतात, सौंदर्यतज्ज्ञाच्यारूपात व्यवसाय करताना आलेल्या अनुभवांनी मनातला एक कप्पा भरायला लागला होता. नवऱ्याबरोबर संवाद साधताना, गप्पामारताना, मनाच्यातळाशी दडी मारून बसलेले अनुभव मग हळूचडोके वर काढतआम्हाउभयतांना कधी हसवत, तर कधी विचार करायला प्रवृत्त करीत.’
या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मनोगतात त्या म्हणतात, ‘आयुष्याचा सुंदरपट विणताना ह्याअनुभवांनी जीवनाला अर्थप्राप्त करून दिला. अनुभवाचे हे धडे मला शहाणे करत, शिकवत राहिले. त्यांच्यासकारात्मक उर्जेने मी भारावून गेले. अनुभवांच्याअनुभवलेल्यात्याक्षणांनी मनात भावनांचे असंख्यतरंग उमटू लागले होते.’

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPriya Khairepatil
LanguageMarathi
ISBN9789395139335
BindingPaperback
Pages164
Publication Year2022
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review