Mantarang

BK00696

New product

कविता म्हणजे तुमच्या मनातील भावभावना, एखाद्या प्रसंगामुळे उठलेले विचारांचे आणि भावनांचे तरंग शब्दात मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. प्रिया खैरेपाटील यांच्या मनतरंग या कवितासंग्रहातील साऱ्या कविता वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय देतात. 

More details

₹ 130 tax incl.

More Info

या कवितांची लांबी विषम आहे, काही कविता एक पानी तर काही थोड्या मोठ्या आहेत. या कवितासंग्रहामध्ये या कवितांना समर्पक अशी अतिशय रेखीव चित्रे सामाविष्ट करण्यात आली आहेत. या कवितांमध्ये कवयित्री विविध विषय हाताळताना दिसतात. विठ्ठलाबद्दलच्या कवितेने संग्रहाची सुरुवात होते तर शेवटची कविता चहा आणि कवयित्रीचं नातं उलगडून सांगते.
अतिशय सोप्या भाषेत लिहिलेल्या या कविता दैनंदिन आयुष्यातील घडामोडींवर सूचक भाष्य करतात. वरवर अतिशय साधारण वाटणाऱ्या या कवितांमधून काही वेळा कवयित्रीने मानवी नात्यांबद्दल, आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीबद्दल, स्त्रियांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टीकोनाबद्दल अतिशय नेमकेपणाने भाष्य केलं केलं आहे.

लेखिकेविषयी:

कवयित्री आणि लेखिका प्रिया खैरेपाटील या व्यवसायाने सौंदर्यतज्ज्ञ (ब्युटीशियन) आहेत. या कवितासंग्रहा आधी ‘मनाच्या आरशात’ हा त्यांचा लेखसंग्रह डिसेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झाला होता.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPriya Khairepatil
LanguageMarathi
ISBN9789395139670
BindingPaperback
Pages70
Publication Year2023
Dimensions7 x 7

Reviews

Write a review

Mantarang

Mantarang

कविता म्हणजे तुमच्या मनातील भावभावना, एखाद्या प्रसंगामुळे उठलेले विचारांचे आणि भावनांचे तरंग शब्दात मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. प्रिया खैरेपाटील यांच्या मनतरंग या कवितासंग्रहातील साऱ्या कविता वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय देतात.