BK00015
New product
'रूपक कथा' हा लेखकाच्या काही निवडक कथांचा संग्रह आहे. खरंतर या लघुकथा असल्या तरीही त्या वाचकाच्या मनाचा ताबा घेतात. काही क्षण का होईना वाचकाला विचार करायला भाग पाडतात हेच या कथांचं वैशिष्ट्य.
This product is no longer in stock
Warning: Last items in stock!
Availability date:
Roopak Katha
'रूपक कथा' हा लेखकाच्या काही निवडक कथांचा संग्रह आहे. खरंतर या लघुकथा असल्या तरीही त्या वाचकाच्या मनाचा ताबा घेतात. काही क्षण का होईना वाचकाला विचार करायला भाग पाडतात हेच या कथांचं वैशिष्ट्य.
Recipient :
* Required fields
or Cancel
कथा वाचताना काही वेळा प्रसंग, ठिकाण डोळ्यांसमोर उभं राहतं. यातील सगळ्याच कथा काही ना काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे लेखक शशांक देव यांनी यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसते. माणूस आणि निसर्गाचं एक वेगळं नातं असलं तरी काही वेळा माणूस निसर्गाच्या विरुद्ध थोडा जरी वागला तरी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात हे काही कथांमधून दिसते. तर काही कथांतून नातेसंबंधावरही प्रकाश टाकला आहे.
कथा लहान असल्या तरी त्यात एक चांगला आशय आहे. खरंतर या आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना आपल्याच बाबतीत घडत आहेत असे सतत वाटत राहते. मानवी जीवनातील सुख-दुःखही मांडण्याचा यात प्रयत्न दिसतो. या कथा वाचताना अस्वस्थ व्हायला होणं आणि विचार करायला भाग पडणं हेच या कथासंग्रहाचे यश आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Shashank Deo |
Language | Marathi |
ISBN | 9789395139366 |
Binding | Paperback |
Pages | 56 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |