Shimpalyatla Moti

BK00681

New product

आईबद्दलच्या आदराने भरलेले आणि तिच्याबद्दल मनी असलेल्या कृतज्ञतेने नटलेले हे पुस्तक हा वैयक्तिक नात्यांचा कोलाज असला तरी यातून सामन्यातील असामान्य अशा लेखिकेच्या आईचा जीवनप्रवास, त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपल्यासमोर उभा राहतो.

More details

₹ 199 tax incl.

More Info

आपल्या आईच्या संस्काराने कोणत्याही व्यक्तीची जडणघडण होत असते. प्रा. अंजना चौगुले चावरे यांच्या मातोश्री सुनंदा यांनीही त्यांना आणि त्यांच्या भावंडांना अतिशय कष्टाने आणि प्रेमाने वाढवले. स्वत:चे फारसे शिक्षण नसतानाही आपल्या सर्व मुलांनी शिकावे आणि आपले आयुष्य घडवावे अशी त्यांची इच्छा होती.
आपल्या आईचे, जिला त्या आऊ असे म्हणत, तिचे संस्कार, तिचे विचार, तिची बोली आणि तिची माया रुजवण्यासाठी तिचे आयुष्य अक्षर स्वरूपात साठवून ठेवावी या विचारातून प्रा. अंजना चौगुले चावरे यांनी आपल्या आईचे हे आठवणींनी भरलेले चरित्ररुपी पुस्तक लिहिले आहे.
आईबद्दलच्या आदराने भरलेले आणि तिच्याबद्दल मनी असलेल्या कृतज्ञतेने नटलेले हे पुस्तक हा वैयक्तिक नात्यांचा कोलाज असला तरी यातून सामन्यातील असामान्य अशा लेखिकेच्या आईचा जीवनप्रवास, त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपल्यासमोर उभा राहतो. या पुस्तकात श्री. विकास कर्वे यांनी काढलेली सुबक रेखाचित्रे या पुस्तकाला वेगळीच उंची प्राप्त करून देतात. या पुस्तकाचे डिझाईन, मुखपृष्ठ आणि रचना ही लक्षवेधक आहे.

लेखिकेविषयी : प्रा. अंजना चौगुले - चावरे या जयसिंगपूर येथे राहत असून त्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे गेली १० वर्षे हिंदी विषय शिकवतात. त्यांना वाचन, वक्तृत्व आणि सूत्र संचालनाची आवड असून ‘जगू आनंदाने’ या नावाने त्यांचे एक युट्युब चॅनेलदेखील आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorProf. Anjana Chougule-Chavare
LanguageMarathi
ISBN9789395139717
BindingPaperback
Pages104
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Shimpalyatla Moti

Shimpalyatla Moti

आईबद्दलच्या आदराने भरलेले आणि तिच्याबद्दल मनी असलेल्या कृतज्ञतेने नटलेले हे पुस्तक हा वैयक्तिक नात्यांचा कोलाज असला तरी यातून सामन्यातील असामान्य अशा लेखिकेच्या आईचा जीवनप्रवास, त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपल्यासमोर उभा राहतो.