Rubab

BK00710

New product

ग्रामीण भागातील वाडासंस्कृती, एकत्रित कुटुंबपद्धती, गावगाडा आणि त्याभोवताली चालणारं राजकारण, बैलगाडा शर्यती हे सारं अनुभवायचं असेल तर अमोल सोंडकर यांची 'रूबाब' ही कादंबरी वाचली पाहिजे. गावाकडील जीवनमानाचं प्रतिबिंब या कादंबरीत उमटलेलं आहे.

More details

₹ 140 tax incl.

More Info

यामध्ये त्यांनी वाडा संस्कृतीतील तीन पिढ्यांचा जीवनपट मांडला आहे. एका कुटुंबाच्या आपुलकीचा, प्रेमाचा आणि गावाच्या प्रगतीसाठी झोकून दिलेल्या सेवाभावी वृत्तीचा सुमारे शंभर वर्षांचा इतिहास यातून उलगडत जातो.
ग्रामीण बोली, विशिष्ट शब्दरचना, प्रसंग फुलवण्याचे कसब आणि नाट्यमयता यामुळे ग्रामीण भागातील जिवंत चित्रण वाचकांच्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे ही कादंबरी वाचकांच्या मनावरही 'रूबाब' गाजवते.

लेखकाविषयी :
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरी येथे ट्रेनी ऑफिसर म्हणून कार्यरत. ग्रामीण भागातील वाडा संस्कृतीमध्ये बालपण गेल्यामुळे खेड्याशी नाळ जोडलेली आहे. प्रेमकथेवर आधारीत 'सावज तुमच्या आणि माझ्या मनातील' व 'फुलपाखरु : “रंग काळजाशी भिडलेला" या कादंबरीवर लेखन तसेच 'वाऱ्यासारखं वादळावरती’ या कवितासंग्रहाचे लेखन केलेले आहे.
शेतकरी कुटुंब तसेच शेतकऱ्यांच्या व्यथा आणि समस्या सोडविण्याबाबत आग्रही भूमिका असते. प्रभावी वक्तृत्व, लेखन, कुस्ती, क्रिकेट तसेच ग्रामीण भागातील रांगडा मैदानी खेळ म्हणजे 'बैलगाडी शर्यत' या क्षेत्राची लेखकाला विशेष आवड आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorAmol Sondkar
LanguageMarathi
ISBN9788119311002
BindingPaperback
Pages90
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Rubab

Rubab

ग्रामीण भागातील वाडासंस्कृती, एकत्रित कुटुंबपद्धती, गावगाडा आणि त्याभोवताली चालणारं राजकारण, बैलगाडा शर्यती हे सारं अनुभवायचं असेल तर अमोल सोंडकर यांची 'रूबाब' ही कादंबरी वाचली पाहिजे. गावाकडील जीवनमानाचं प्रतिबिंब या कादंबरीत उमटलेलं आहे.