Kawadase

BK00637

New product

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अरविंद वैद्य यांनी त्यांना जगण्यात आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत.

More details

₹ 350 tax incl.

More Info

रोजच्या जगण्यात आपल्याला विविध अनुभव येत असतात. त्यात नवीन माणसे भेटत असतात, नवीन ठिकाणे आपण अनुभवत असतो. काहीवेळा ही माणसे आणि ठिकाणे मनात घर करून राहतात. आणि त्यांचे होतात लेख. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अरविंद वैद्य यांनी त्यांना जगण्यात आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारचे प्रवासाचे अनुभव, त्यांना भेटलेली माणसे यांची रसभरीत वर्णने केली आहेत. लिखाण हा त्यांच्या जगण्याचा एक उत्तम छंद आहे असे ते मानतात. त्यातूनच त्यांचे हे लालित्यपूर्ण लेखन ‘कवडसे’ च्या माध्यमातून वाचकांच्या समोर त्यांनी मांडले आहेत.

लेखकाविषयी :
लेखक अरविंद वैद्य यांनी अहमदनगर येथील ‘गुणे’ महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले, त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिका आरोग्य विभागात क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली. त्यांना मराठीतून विविध विषयांवर लेख लिहिण्याचा छंद असून, ‘कवडसे’ हे त्यांचे ललित लेखांचे पुस्तक त्यांनी पहिल्यांदाच लिहिले आहे. यापूर्वी त्यांनी विविध ऑनलाइन माध्यमातून लेखन केले आहे. ‘माझे अमेरिकाटन’ आणि ‘प्राजक्त गंध’ या नावाने त्यांचे ललित लेखन ‘ई-साहित्य’ स्वरूपात प्रसिद्ध झाले आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Arvind Bhalchandra Vaidya
LanguageMarathi
ISBN9789395139755
BindingPaperback
Pages238
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Kawadase

Kawadase

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अरविंद वैद्य यांनी त्यांना जगण्यात आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत.