BK00706
New product
डॉ. गिरीश दाबके यांच्या निवडक लेखनाचे संकलन या पुस्तकात केले आहे. यात त्यांनी लिहिलेल्या एकूण सात कथा, सहा लेख, ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ हे नाटक, काही मुक्तछंद, लय –प्रलय, कोडिंग-डीकोडिंग या कादंबऱ्या आणि संकीर्ण असे भाग केलेले आहेत.
Warning: Last items in stock!
Availability date:
Nivdak Dr. Girish Dabke - Bhag 1
डॉ. गिरीश दाबके यांच्या निवडक लेखनाचे संकलन या पुस्तकात केले आहे. यात त्यांनी लिहिलेल्या एकूण सात कथा, सहा लेख, ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ हे नाटक, काही मुक्तछंद, लय –प्रलय, कोडिंग-डीकोडिंग या कादंबऱ्या आणि संकीर्ण असे भाग केलेले आहेत.
Recipient :
* Required fields
or Cancel
या पुस्तकाचे संपादन सुनील जोशी आणि प्रमोद बापट यांनी केले आहे. यात लेखक गिरीश दाबके यांनी केलेले जीवनाविषयीचे मुक्तचिंतन आलेले आहे. मुक्तछंदात लेखक स्वतःशीच कसा संवाद साधतो हे त्यांच्या लेखणीतून दिसून येते. काळानुसार होणारा संघर्ष गिरीश आपल्या कथेतून अतिशय प्रभावीपणे मांडतात.
त्यांच्या ‘लय-प्रलय’ या कादंबरीतून अनेक पात्रांना त्यांनी सचित्र उभे केले आहे. त्यांच्या लेखनातून त्यांनी समाजवाद, साम्यवाद, सावरकरांचे हिंदुत्व तठस्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जवळजवळ पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी लेखन केले असून, त्यातील निवडक लेखन ‘निवडक डॉ. गिरीश दाबके’ या पुस्तकातून वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लेखकाविषयी :
डॉ. गिरीश दाबके यांनी गेल्या पन्नास वर्षांत अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी युनियन बँकेत ३७ वर्षे सेवा केली. मॅनेजर या पदावरून ते निवृत्त झाले. चार कादंबऱ्या, चार कथासंग्रह, दोन लेख संग्रह, तीन चरित्र ग्रंथ लिहिले असून, नरेंद्र मोदींवर लिहिलेले ‘नरेंद्रायण’ हे चरित्र विशेष गाजलेले आहे. त्यांनी अकराहून अधिक नाटके लिहिली आहेत. दूरदर्शनसाठी त्यांनी मालिकाही लिहिल्या आहेत. तसेच त्यांनी वेबसिरिजही लिहिल्या आहेत. दोन पुस्तकांचे अनुवाद लिहिले आहेत. विविध विषयांवर हजारहून अधिक भाषणे दिली आहेत. अनेक चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या ‘चाँदनी’ नावाच्या गुजराती पाक्षिकातून तेहतीस कथा प्रकाशित आहेत. विविध मालिकांतून त्यांनी अभिनय देखील केला आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Girish Dabke |
Language | Marathi |
ISBN | 9789395139915 |
Binding | Paperback |
Pages | 358 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |