New Vachanvata

Vachanvata

BK00758

New product

जागतिक साहित्यातील महत्त्वाच्या साहित्याचा परिचय 

More details

₹ 399 tax incl.

More Info

सकाळ-अ‍ॅग्रोवन मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मला भावलेलं पुस्तक’ या स्तंभलेखनाचं हे संग्राह्य पुस्तक. ‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारातील प्रस्तुत पुस्तकातून आदिनाथ चव्हाण वाचकांना जागतिक साहित्य विश्वातील एकेक अनमोल नक्षत्र निरखून पाहण्याची रीत दाखवतात.

 • स्थलातीत, कालातीत असणाऱ्या श्रेष्ठ साहित्यकृतींमध्ये काय भावलं याची एका साक्षेपी संपादकाने घेतलेली नोंद
 • काय वाचावं? वाचलेलं स्वतःत कसं रुजवावं? वाचनातून अधिक शहाणं कसं व्हावं? या विषयीच्या दिशा दाखवणारं पुस्तक
 • माणूस, माणसाचं जगणं, निसर्ग, प्रेम, युद्ध संहार यातून तरलेली मानवता, राजकारण, मानसशास्त्र, जगण्याचं तत्त्वज्ञान अशा सगळ्या विषयांतील पुस्तकांची निवड
 • वाचनावर प्रेम करणाऱ्या आणि वाचलेलं सर्वानी वाचावं अशी आस्था बाळगणाऱ्या साहित्यप्रेमी व्यक्तीने केलेलं लेखन
 • प्रत्येक वाचणाऱ्या माणसाच्या संग्रही असावे असे पुस्तक

लेखकाविषयी माहिती :

आदिनाथ चव्हाण हे गेली पस्तीस वर्ष पत्रकारीतेत आहेत. सकाळ माध्यम समूहात बातमीदारपदापासून सुरू झालेली त्यांची वाटचाल या समूहाच्या ‘ॲग्रोवन’ या कृषिविषयक दैनिकाच्या संपादक संचालक पदापर्यंत पोहोचली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हे त्यांचं मूळ गाव. इथूनच त्यांचा बहुआयामी वाचनप्रवास सुरू झाला.

पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक मानसन्मान, पुरस्कार लाभले. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या भारत कृषक समाजातर्फे कृषी पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली ‘ॲग्रोवन’ला राष्ट्रीय पातळीवरील विविध सन्मान, पुरस्कार लाभले.

अलंकारिकता टाळणारी साधी प्रवाही भाषा, मनात घर करणारी चपखल शब्दयोजना हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorAdinath Chavan
LanguageMarathi
ISBN9788119311026
Edition1
BindingPaperback
Pages272
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Vachanvata

Vachanvata

जागतिक साहित्यातील महत्त्वाच्या साहित्याचा परिचय 

Customers who bought this product also bought:

 • Shunya by Sri M

  श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या...

  ₹ 239

 • Vivekwel

  वसंत गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत, गरिबीत...

  ₹ 499

 • Pandora Box

  जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक...

  ₹ 299