Vyaktimatwa Vikasacha Collage

BK00751

New product

‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व कसे घडते आणि आपण त्यात सुधारणा कशा घडवू शकतो त्यावर भाष्य करते. 

More details

₹ 200 tax incl.

More Info

‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व कसे घडते आणि आपण त्यात सुधारणा कशा घडवू शकतो त्यावर भाष्य करते. व्यक्तिमत्व विकास ही सततची प्रक्रिया आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला माहीत नसतात. किंबहुना आपले व्यक्तिमत्व कसे घडते याची जाणीव आपल्याला असतेच असे नाही. संस्कारातून आपले व्यक्तिमत्व घडत असते, व्यक्तिमत्व हा अनेक पैलूंचा असतो, तो एक ‘कोलाज’ असतो. म्हणूनच या सर्व पैलूंना ओळखून व्यक्तिमत्व कसे तासावे हे या पुस्तकात विनोद बिडवाईक यांनी सांगितले आहे.

लेखकाविषयी :
विनोद बिडवाईक हे मानव संसाधन (ह्यूमन रिसोर्स) आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांना तब्बल २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव ह्या क्षेत्रात आहे. मोठमोठया भारतीय आणि बहुराष्ट्रीय उद्योगांमध्ये त्यांनी उच्चपदावर काम केलेले आहे.

ते सध्या एपी ग्लोबले आणि सकाळ मीडिया ग्रुपमध्ये ग्रुप डायरेक्टर-एचआर म्हणून काम करत आहेत. यापूर्वी ते अल्फा लावल, मध्ये CHRO आणि VP-HR म्हणून कार्यकरत होते. त्यांनी डीएसएम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये संचालक - HR , महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या इंजिन प्लांटमध्ये एचआर आणि आयआरप्रमुख, सेम्परिट ग्रुपमध्ये प्लांट एचआर हेड म्हणूनही काम केले आहे.
व्यवस्थापन जर्नल्स आणि मासिकांमध्ये ते नियमितपणे लिहितात. ते बॉम्बे मॅनेजमेंटअसोसिएशन, एनआयपीएम आणि एनएचआरडीचे आजीवन सदस्य आणि वेगवेगळ्या मंचांवर नियमित वक्ते आहेत. ते इंग्रजी आणि मराठी दैनिके आणि मासिकांमध्ये नियमित स्तंभलेखकही आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorVinod Bidwaik
LanguageMarathi
ISBN9788196354077
BindingPaperback
Pages122
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Vyaktimatwa Vikasacha Collage

Vyaktimatwa Vikasacha Collage

‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व कसे घडते आणि आपण त्यात सुधारणा कशा घडवू शकतो त्यावर भाष्य करते. 

Customers who bought this product also bought: