Murdan

BK00709

New product

मुरडण या शब्दाचा प्रमाण भाषेतील अर्थ वळण असा होतो. कवी आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालाजी मदन इंगळे यांचा हा पहिलाच ललित लेख संग्रह आहे. मराठवाडा आणि कर्नाटक सीमेलगत असलेल्या उमरगा आणि आजूबाजूच्या परिसरात जी बोलीभाषा बोलली जाते, त्या बोलीभाषेचा, लयीचा वापर त्यांनी या संग्रहातील लेखांमध्ये केला आहे.

More details

₹ 130 tax incl.

More Info

या संग्रहात एकूण ३३ ललित लेख समाविष्ट आहेत. त्यापैकी काही लेख दै. सकाळच्या मराठवाडा आवृत्तीच्या ‘मैफल’ पुरवणीसाठी बालाजी मदन इंगळे यांनी लिहिले होते.
या बोलीभाषेच्या आणि त्यातील लयीच्या वापरामुळेच या सर्व सदरांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या बोलीभाषेची लय, उमरगा आणि परिसरातील लोकांचं राहणीमान हे सारं अनुभवायचं असेल तर हे पुस्तक तुमच्या संग्रही असलंच पाहिजे.

लेखकाविषयी :
बालाजी मदन इंगळे हे उमरगा स्थित लेखक असून याआधी त्यांची ‘झिम् पोरी झिम्’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीमध्ये सुद्धा त्यांनी या परिसरातील बोलीभाषेचा, त्यातील लयीचा वापर केला होता. याबरोबरच त्यांचे ‘मातरं’ आणि ‘मेलं नाही अजून आभाळ’ असे दोन कविता संग्रह प्रकाशित आहेत. ‘रंगीत रंगीत रानफुल’ हा बालकविता संग्रह देखील त्यांनी लिहिला आहे. कादंबरी आणि दोन्ही कविता संग्रहांना मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार लाभले आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorBalaji Madan Ingale
LanguageMarathi
ISBN9789395139939
BindingPaperback
Pages76
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Murdan

Murdan

मुरडण या शब्दाचा प्रमाण भाषेतील अर्थ वळण असा होतो. कवी आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालाजी मदन इंगळे यांचा हा पहिलाच ललित लेख संग्रह आहे. मराठवाडा आणि कर्नाटक सीमेलगत असलेल्या उमरगा आणि आजूबाजूच्या परिसरात जी बोलीभाषा बोलली जाते, त्या बोलीभाषेचा, लयीचा वापर त्यांनी या संग्रहातील लेखांमध्ये केला आहे.

Customers who bought this product also bought: