Annaprakriya Udyog

BK00626

New product

विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, भाज्या वापरून टिकाऊ खाद्यपदार्थ बनवणे, हे 'अन्नप्रक्रिया' उद्योगाचे खरे स्वरूप! यांपैकी फळ-भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे तंत्रज्ञान व या उद्योगासाठी लागणारी माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने 'अन्नप्रक्रिया उद्योग' या पुस्तकाची निर्मिती लेखिका, व्यावसायिक तज्ज्ञ डॉ. ललिता बोरा यांनी केली आहे.

More details

₹ 563 tax incl.

-25%

₹ 750 tax incl.

More Info

अन्नप्रक्रिया उद्योगासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान, गुणवत्ता, मापदंड, कुटीर, मध्यम व मोठ्या उद्योगासाठी लागणारी आवश्यक मशिनरी यांची माहिती, पुरवठादारांची यादी, प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या मशिनरी यांची माहितीही आहे.
भारतीय अन्नसुरक्षा मंत्रालयाच्या (FSSAI) नियमानुसार 'जीएमपी' आणि 'जीएचपी' तसेच 'एचएसीसीपी'चे उदाहरणांसह विश्लेषण, उद्योगाच्या उभारणीपूर्वी उद्योजकांना तयार कराव्या लागणाऱ्या 'प्रकल्प-अहवाला'चा नमुना, उपयुक्त वेबसाईट, कार्यालयांची यादी, आवश्यक कागदपत्रांविषयीचा तपशील तसेच उद्योजकाच्या गुणवत्तेविषयीचे विश्लेषण यामध्ये आहे.
सूक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिक, 'स्टार्टअप' उद्योजक, शेतीपूरक व्यावसायिक, विद्यार्थी ते गृहिणी या सर्वांना प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक ठरणारे, थोडक्यात अन्नप्रकिया उद्योजक बनण्याचे प्रशिक्षण देणारे संदर्भ पुस्तक!

लेखिकेविषयी माहिती :

डॉ. ललिता विजय बोरा यांनी बी.ए. (अर्थशास्त्र), 'फूड अँड न्यूट्रिशियन,' कोर्स, मानव संसाधन मंत्रालय, भारत सरकार, सी.एफ.टी.आर.आय., म्हैसूर, येथून अन्नतंत्रज्ञ हे शिक्षण घेतले आहे. 'इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री', ई.सी.सी.पी प्रोग्राम, एम.बी.ए., आय.एस.बी., हैदराबाद, डॉ. गोल्डन स्मिथ आयोजित आंत्रेप्रेन्यूअर प्रोगाम, डॉक्टरेट, 'विश्वकर्मा व्होकेशन युनिव्हर्सिटी' गुडगांव, (डॉक्टरेट इन फूड सायन्स), 'ग्रेस लेडीज ग्लोबल अॅकॅडमी', सिंगापूर (डॉक्टरेट इन कम्युनिटी फिटनेस अँड हेल्थ) या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. उद्योगिनी पुरस्कार, पश्‍चिम महाराष्ट्र (१९९८), आरोग्य आणि स्वास्थ्यविषयक सामाजिक-आर्थिक प्रकल्पासाठी ग्लोबल सर्वोत्कृष्ट पुरस्कार (२०२२), यांसह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. 'टोबॅको रिप्लेसमेंट टूल' हे तंबाखूमुक्त अभियान २०१७पासून त्यांनी सुरू केले आहे. अल्कोहोल रिप्लेसमेंट ज्यूसेस तसेच फळे, भाज्या आणि औषधी वनस्पती यांची नैसर्गिक तयार उत्पादने हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Lalita Vijay Bora
LanguageMarathi
ISBN978-93-95139-39-7
BindingPaperback
Pages196
Publication Year2023
Dimensions7 x 9.5

Reviews

Write a review

Annaprakriya Udyog

Annaprakriya Udyog

विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, भाज्या वापरून टिकाऊ खाद्यपदार्थ बनवणे, हे 'अन्नप्रक्रिया' उद्योगाचे खरे स्वरूप! यांपैकी फळ-भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे तंत्रज्ञान व या उद्योगासाठी लागणारी माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने 'अन्नप्रक्रिया उद्योग' या पुस्तकाची निर्मिती लेखिका, व्यावसायिक तज्ज्ञ डॉ. ललिता बोरा यांनी केली आहे.

Customers who bought this product also bought: