BK00735
New product
प्रा. डॉ. यशवंत पाटील यांची ‘गढीवरच्या आईसाहेब’ ही कादंबरी अतिशय प्रत्ययकारी असून त्यात दोन संस्कृतींची आंतरवर्तुळे एकमेकांत कशी गुंफली आहेत हे सांगितले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Gadhivarchya Aaisaheb
प्रा. डॉ. यशवंत पाटील यांची ‘गढीवरच्या आईसाहेब’ ही कादंबरी अतिशय प्रत्ययकारी असून त्यात दोन संस्कृतींची आंतरवर्तुळे एकमेकांत कशी गुंफली आहेत हे सांगितले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
प्रा. डॉ. यशवंत पाटील यांची ‘गढीवरच्या आईसाहेब’ ही कादंबरी अतिशय प्रत्ययकारी असून त्यात दोन संस्कृतींची आंतरवर्तुळे एकमेकांत कशी गुंफली आहेत हे सांगितले आहे. एकीकडे गढीवरचे मराठी खानदान आणि दुसरीकडे सुसंस्कृत असे ब्राम्हण कुटुंब यांचे चित्रण लेखकाने अतिशय ताकदीने मांडले आहे. ब्राम्हण कुटुंबातील केतकी आणि श्रीमंतीत वाढलेला गढीचा वारसदार रणधीर यांच्या प्रेमाची ही आगळीवेगळी गोष्ट या कादंबरीत आहे. गढीवरच्या आईसाहेब या दोघांच्या प्रेमाला विरोध न करता त्यांना पाठिंबा देतात आणि आशीर्वाद देतात. या प्रेमकथेची गुंफण यशवंत पाटील यांनी अतिशय प्रभावीपणे केली असून त्यात कुठेही बटबटीतपणा जाणवत नाही हे त्यांच्या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. लेखकाची संयत शैली, उत्तम शब्दचातुर्य आणि व्यक्तिरेखांसोबत सावलीसारखे येणारे माधुर्य वाचकांना मोहीत केल्याशिवाय राहणार नाही.
लेखकाविषयी :
लेखक प्रा. डॉ. यशवंत पाटील यांना तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी शैक्षणिक, आध्यात्मिक, वैचारिक, प्रौढ, ललित साहित्यात पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. श्री स्वामी समर्थांवर त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांच्यावर सातहून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Prof. Dr. Yashwant Patil |
Language | Marathi |
ISBN | 978-81-19311-09-5 |
Binding | Paperback |
Pages | 84 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |