BK00793
New product
‘उपेक्षितांचे जगणे’ या संदीप काळे लिखित लेखसंग्रहात एकूण ३७ लेख असून, त्यात विविध स्तरातील सामाजिक आशयाचे आणि सकारात्मक अनुभवांचे लेखन आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Upekshitancha Jagana
‘उपेक्षितांचे जगणे’ या संदीप काळे लिखित लेखसंग्रहात एकूण ३७ लेख असून, त्यात विविध स्तरातील सामाजिक आशयाचे आणि सकारात्मक अनुभवांचे लेखन आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
‘सकाळ’ सप्तरंग पुरवणीच्या ‘भ्रमंती लाईव्ह’ या सदराअंतर्गत संदीप काळे यांनी केलेले लेखन आहे. त्यांच्या लेखनात त्यांनी माणुसकीचा संदेश नकळतपणे दिलेला आहे. लेखकाने या लेखसंग्रहात वेगळी अशी लेखन निर्मिती केली आहे, एखादा माणूस कुठल्यातरी अडचणीत अडकल्यावर त्याला लेखनाच्या माध्यमातून त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे मोलाचे काम संदीप यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. एकप्रकारे समाजाला धडा देण्याचे महत्त्वाचे काम या पुस्तकातून झाले आहे. या पुस्तकात माणुसकीचा प्रत्येक शब्द न् शब्द पाझरताना दिसतो. अवतीभवती जे काही भले-बुरे घडत जाते, त्याचे टिपण लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. ज्यांना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, अशा माणसांना या लेखनाने उभारी दिल्याची उदाहरणे या पुस्तकात आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्ठ्य आहे. उपेक्षितांचे जगणे हे खऱ्या अर्थाने कसे असते हे या पुस्तकाच्या माध्यमातून सांगायचं प्रामाणिक प्रयत्न लेखकाने केला आहे.
लेखकाविषयी :
संदीप काळे हे सध्या ‘सकाळ’ माध्यम समूहात युवा संपादक म्हणून कार्यरत असून त्यांची एकूण ६१ पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांनी २२ दिवाळी अंकांचे संपादन केले आहे. १५० हून अधिक विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’पुरवणीत त्यांचे ‘भ्रमंती लाईव्ह’ हे लोकप्रिय सदर सुरू असून ‘सकाळ यंग इन्सपीरेटर नेटवर्क’ अर्थात ‘यीन’चे ते प्रमुख आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Sandip Ramrao Kale |
Language | Marathi |
ISBN | 978-81-19311-24-8 |
Binding | Paperback |
Pages | 152 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |