BK00619
New product
विविध आजार टाळण्यासाठी आपला आहार-विहार आणि सवयी बदलणे अत्यंत आवश्यक आहे. आपली जीवनशैली, आहार नेमका कसा असावा, याविषयी माहिती देणारे पुस्तक.
Warning: Last items in stock!
Availability date:
Arogyacha Mulmantra
विविध आजार टाळण्यासाठी आपला आहार-विहार आणि सवयी बदलणे अत्यंत आवश्यक आहे. आपली जीवनशैली, आहार नेमका कसा असावा, याविषयी माहिती देणारे पुस्तक.
Recipient :
* Required fields
or Cancel
आपले आरोग्य निरायम राहाणे हे शारीरिक, मानसिक, सामाजिक घटकांवर अवलंबून असते. मात्र, हे सर्व घटक संतुलितपणे आपल्यामध्ये एकावेळी अस्तित्वात राहात नाहीत. त्यामुळे मग विविध आजार सुरू होतात. ते टाळण्यासाठी आपला आहार-विहार आणि सवयी बदलणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आपली जीवनशैली, आहार नेमका कसा असावा, याविषयी माहिती असणे महत्त्वाचे आहे. ते समजण्यासाठी डॉ. अविनाश भोंडवे यांनी सहजसोप्या शब्दांत दिलेली माहिती सर्वांना उपयुक्त ठरणारी आहे.
ताणतणाव, वेगवेगळे मनोविकार, मानसिक स्थिरता, व्यसनाधीनतेपासून सुटका अशा विविध विषयांवर पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. आरोग्यवर्धक स्वयंपाक, भारतीय आहारशैली, आहारातील विविध पदार्थांची उपयुक्तता, भाज्या-फळांचे महत्त्व, उपवास इत्यादी बाबी आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली याविषयी अतिशय तपशीलवार माहिती पुस्तकामध्ये दिली आहे. या पुस्तकातील लेखन वेगवेगळ्या वेळी केलेले असले तरी, आरोग्याच्या दृष्टीने सर्वांगीण माहिती व उपयुक्त टिप्स दिल्यामुळे ते परिपूर्ण झाले आहे. त्यामुळे आरोग्याचा मूलमंत्र जपताना आपली मन:शैली, आहारशैली कशी जपावी याविषयी अनुभवातून मांडलेले विचार सर्वांना सहजपणे कृतीत उतरवता येतील.
लेखकाविषयी माहिती : डॉ. अविनाश भोंडवे हे एमबीबीएस असून फॅमिली फिजिशियन म्हणून आरोग्यसेवेत कार्यरत आहेत. आपली आरोग्यसेवेतील प्रॅक्टिस करत असतानाच विविध वृत्तपत्रांमधून ते आरोग्यविषयक लेखन करत असतात. त्यातून त्यांनी स्वतःची लेखनशैली विकसित केली आहे. त्यांनी विविध विषयांवर १३ पुस्तकांचे लेखन केले असून पाच हजारांहून अधिक लेखांच्या माध्यमातून आरोग्याबाबत मार्गदर्शन केले आहे. आरोग्य विश्लेषक म्हणून ते वृत्तवाहिन्यांवर अनेकदा दिसतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. करोना महामारीच्या काळातही त्यांनी आरोग्यसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Avinash Bhondwe |
Language | Marathi |
ISBN | 9789395139137 |
Binding | Paperback |
Pages | 196 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 7 x 9.5 |