Rajmata Jijau by Prof. Prakash Pawar

BK00694

New product

महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी. 

More details

₹ 499 tax incl.

More Info

राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील परिचित घटनांची जंत्री देत नाही, तर...

जिजाऊंची जडणघडण कशी झाली? 

त्यांनी शिवरायांना कसे घडवले?

जिजाऊंचा मूल्यविचार नेमका काय होता?  

जिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले? 

हे सांगते आणि जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते. 

  • रयतेची काळजी घेणाऱ्या एक उत्तम प्रशासक जिजाऊ 
  • शहाजीराजांची सखी आणि शिवरायांच्या सल्लागार असणाऱ्या जिजाऊ 
  • पेचप्रसंगांतून तलवारीपेक्षा बुद्धिमत्तेच्या जोरावर वाट काढणाऱ्या जिजाऊ
  • शिवरायांवरच नाही तर त्यांच्या सोबत असणाऱ्या मावळ्यांवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या जिजाऊ 
  • लोकभाषा, लोककला, लोकसंस्कृती, ग्रंथ-काव्यनिर्मिती यांना प्रोत्साहन देणाऱ्या जिजाऊ  
  • जात-धर्म-लिंग-वंश-भाषा या सर्वांपलीकडे जात समतावादी मूल्यांची रुजवण करून लोककल्याणकारी स्वराज्याचा पाया घालणाऱ्या जिजाऊ    
  • शिवराय, संभाजीमहाराज, येसूबाई, ताराराणी यांचीच नाही तर महाराष्ट्रातील आधुनिक विचारवंतांची प्रेरणा ठरलेल्या जिजाऊ 
  • सर्जनशील मानवी चेतनेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार जिजाऊ

असे जिजाऊंच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणारे अभिनव पुस्तक 

जिजाऊंच्या जगण्यावर प्रभाव टाकणारे पूर्वसुरी वणंगपाळ निंबाळकर, लखुजीराव जाधवराव, उमाबाई अशी सर्वसामान्यांना अपरिचित पण महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे या निमित्ताने वाचकांच्या समोर येतात.

इतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्म, भाषा, साहित्य, भूगोल, लोकसंस्कृती अशा विविध अभ्यासशाखांची मर्मदृष्टी घेऊन जिजाऊंच्या जीवनकाळातील घटनांचा घेतलेला आढावा वाचणे ही एक पर्वणीच ठरते.

लेखकाविषयी माहिती :
लेखक प्रा. डॉ. प्रकाश पवार हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी राज्यशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून २०१६ ते २०१८ या काळात काम पहिले आहे. शिवाजी विद्यापीठातील 'गांधी सेंटर' तसेच 'दत्ता देशमुख अध्यासन केंद्रा'चे समन्वयक म्हणून ते काम पाहतात. आधुनिक भारतीय राजकीय विचार आणि राजकीय प्रक्रिया, महाराष्ट्रातील राजकारण हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील मराठा राज्यसंस्थेचे अभ्यासपूर्ण पुनर्विवेचन केले आहे. समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत, साप्ताहिक सकाळ आदी नियतकालिकांमधून त्यांनी राजकीय विषयांवर वैचारिक लेखन केले आहे. त्यांना राज्यातील विविध संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे..

Features

PublisherSakal Prakashan
AuthorProf. Prakash Pawar
LanguageMarathi
ISBN978-81-19311-49-1
BindingHardcover + Jacket
Pages280
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Rajmata Jijau by Prof. Prakash Pawar

Rajmata Jijau by Prof. Prakash Pawar

महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी. 

Customers who bought this product also bought: