Sudharit Kamgar Kayde

BK00798

New product

औद्योगिक क्षेत्राला चालना मिळावी आणि विदेशी भांडवल भारतात यावे, या उद्देशाने केंद्र सरकारने सध्याच्या कामगार कायद्यांची पुनर्रचना केली आहे.  हे कामगार कायदे नेमके काय आहेत. यांची विस्तृत आणि सोपी मांडणी म्हणजे लेखक संजय सुखटणकर यांचे 'सुधारित कामगार कायदे' हे पुस्तक. 

More details

₹ 240 tax incl.

More Info

औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये व्यवस्थापन आणि कामगार या दोघांनाही समान न्याय मिळणे, हा एक घटक आहे. सरकारने कामगार कायद्यांचा अभ्यास करून त्यात काय सुधारणा कराव्यात याबाबत केलेल्या शिफारसींचा संक्षिप्त आढावा कायद्यांद्वारे यामध्ये घेतला आहे.
सरकारने सध्याच्या कामगार कायद्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या आणि काही कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार नवीन कामगार कायदे तयार केले, त्याचे हे विवेचन!
इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड (२०२०), कोड ऑन वेजेस (२०१९), ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड (२०२०), कोड ऑन सोशल सिक्युरिटी (२०२०) हे कायदे सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
कामगार, कामगार संघटना, व्यवस्थापक, व्यवस्थापन समित्या, नोकरदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक

लेखकाविषयी : लेखक संजय सुखटणकर हे पुणे विद्यापीठाच्या शास्त्र, कायदा आणि बिझिनेस मॅनेजमेंट या विषयांचे पदवीधर आहेत. त्यांनी 'दैनिक तरुण भारत'मध्ये पाच वर्षे उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर 'प्रीमियर ऑटोमोबाइल्स,' 'जॉन्सन अँड जॉन्सन,' 'क्रॉम्प्टन ग्रीव्हज्, 'सीबा-गायगी', स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि ज्युबिलंट या नामवंत कंपन्यांमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले. 'सेंचुरी एन्का' या कंपनीतून उपाध्यक्ष म्हणून ते निवृत्त झाले. सुखटणकर यांनी अल्लाना, सिंहगड आणि इंदिरा या प्रमुख मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आठ वर्षे प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. सकाळ व अन्य मराठी वृत्तपत्रांमध्ये ‘कामगार कायदा’ याविषयावर विपुल लेखन केले आहे. ‘कामगार कायदे’ ‘मॅनेजमेंट माफिया’ ही कादंबरी त्याशिवाय 'इंडस्ट्रियल रिलेशन्स' आणि 'लेबर लॉ' या दोन विषयांवर त्यांनी मार्गदर्शनपर पुस्तके लिहिली आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSanjay Sukhtankar
LanguageMarathi
ISBN9788119311361
BindingPaperback
Pages102
Publication Year2023
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Sudharit Kamgar Kayde

Sudharit Kamgar Kayde

औद्योगिक क्षेत्राला चालना मिळावी आणि विदेशी भांडवल भारतात यावे, या उद्देशाने केंद्र सरकारने सध्याच्या कामगार कायद्यांची पुनर्रचना केली आहे.  हे कामगार कायदे नेमके काय आहेत. यांची विस्तृत आणि सोपी मांडणी म्हणजे लेखक संजय सुखटणकर यांचे 'सुधारित कामगार कायदे' हे पुस्तक.