BK00724
New product
‘पालवी’ हा काशीराम सखाराम बोरे यांचा बाल-कवितासंग्रह आहे. निसर्गात होणारे बदल कवीने अतिशय संवेदनशीलपणे त्यांच्या कवितेत टिपलेले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Palavi
‘पालवी’ हा काशीराम सखाराम बोरे यांचा बाल-कवितासंग्रह आहे. निसर्गात होणारे बदल कवीने अतिशय संवेदनशीलपणे त्यांच्या कवितेत टिपलेले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
बोरे यांचा हा पहिलाच बाल-कवितासंग्रह आहे.या संग्रहात एकूण ६३ कविता आहेत. प्रत्येक कवितेचे शीर्षक हे वेगळे असले तरी त्यांच्या प्रत्येक कवितेतील निसर्ग हा एक समान दुवा आहे. त्यांच्या कवितेतून त्यांची सौंदर्यदृष्टी दिसून येते. तसेच त्यांची निरीक्षणे त्यांनी सोप्या शब्दांत आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडली आहेत. साधी, सरळ आणि सुबोध भाषा हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. झाडे, पशू, पक्षी, आजूबाजूचा परिसर, लहान मुलांचे निरागस भावविश्व यांची त्यांनी साध्या भाषेत मांडणी केली आहे. मुलांचे नुसते मनोरंजनच नाही, तर त्यातून त्यांचे प्रबोधनही व्हावे हा हेतू त्यांच्या कवितेतून स्पष्ट दिसून येतो. या कवितासंग्रहातून वाचकांना नक्की आनंदही मिळेल.
कवीविषयी :
कवी काशीराम सखाराम बोरे यांनी शिक्षक आणि पर्यवेक्षक म्हणून अडतीस वर्षे काम केले आहे. सध्या ते सेवानिवृत्त असून कविता, लेख, कथा लिहिणे हा त्यांचा छंद आहे. त्यांना झाडे लावायला आवडतात झाडांच्या संवर्धनासाठी ते सक्रियपणे सहभागी होतात. त्यांना त्यांच्या शैक्षणिक सेवेत अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. ‘पालवी’ हा त्यांचा पहिला बाल-कवितासंग्रह आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Kashiram Sakharam Bore |
Language | Marathi |
ISBN | 978-93-95139-98-4 |
Binding | Paperback |
Pages | 74 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |