BK00618
New product
जीवनसंस्थांचे आरोग्य चांगले राहिले तर मनुष्य निरामय आयुष्य जगू शकतो. ते जपण्यासाठी लेखक डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेली तपशीलवार माहिती आणि मार्गदर्शन लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिला व ज्येष्ठांना उपयुक्त ठरणारे आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Jivansansthanche Arogya
जीवनसंस्थांचे आरोग्य चांगले राहिले तर मनुष्य निरामय आयुष्य जगू शकतो. ते जपण्यासाठी लेखक डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेली तपशीलवार माहिती आणि मार्गदर्शन लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिला व ज्येष्ठांना उपयुक्त ठरणारे आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
मानवी शरीर हे मुख्यतः विविध पेशी, मेंदू, ह्रदय, यकृत, मूत्रपिंड, हाडे, रक्ताभिसरण, चयापचय अशा जीवनसंस्थांनी बनलेले असते. त्यावरच मनुष्याचे जीवनमान अवलंबून असते. या जीवनसंस्थांचे आरोग्य चांगले राहिले तर मनुष्य निरामय आयुष्य जगू शकतो. ते जपण्यासाठी लेखक डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेली तपशीलवार माहिती आणि मार्गदर्शन लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिला व ज्येष्ठांना उपयुक्त ठरणारे आहे.
सर्वसामान्य वाचक, रुग्ण, वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी व आरोग्याविषयी दक्ष राहणाऱ्या सर्वांनाच हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणारे ठरणार आहे.
या पुस्तकामध्ये दिलेली माहिती लेखकाने अतिशय साध्या, सोप्या शब्दांत मांडली आहे. अनेकदा वैद्यकीय संज्ञा आणि संकल्पना सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे असतात. मात्र, लेखकाने त्या सर्वसामान्यांच्या भाषेत मांडल्या आहेत. त्यामुळे त्या सहजपणे सर्वांना समजतील.
हे पुस्तक केवळ आरोग्याविषयीची किंवा शारीरिक, मानसिक स्थिती व जीवनसंस्थांविषयी केवळ माहिती देणारे नाही. लेखकाचा या क्षेत्रातील अनुभव याठिकाणी व्यक्त झाला आहे. त्यामुळे आरोग्य जपण्याचा मंत्रही त्यामध्ये देण्यात आला आहे.
लेखकाविषयी माहिती : डॉ. अविनाश भोंडवे हे एमबीबीएस असून फॅमिली फिजिशियन म्हणून आरोग्यसेवेत कार्यरत आहेत. आपली आरोग्यसेवेतील प्रॅक्टिस करत असतानाच विविध वृत्तपत्रांमधून ते आरोग्यविषयक लेखन करत असतात. त्यातून त्यांनी स्वतःची लेखनशैली विकसित केली आहे. त्यांनी विविध विषयांवर १९ पुस्तकांचे लेखन केले असून पाच हजारांहून अधिक लेखांच्या माध्यमातून आरोग्याबाबत मार्गदर्शन केले आहे. आरोग्य विश्लेषक म्हणून ते वृत्तवाहिन्यांवर अनेकदा दिसतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. करोना साथीच्या काळातही त्यांनी आरोग्यसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Avinash Bhondwe |
Language | Marathi |
ISBN | 978-93-95139-12-0 |
Binding | Paperback |
Pages | 264 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 7 x 9.5 |