BK00646
New product
८७ वयाचे तरुण सायकलपटू आणि पुण्यात स्थायिक असणारे नोवोदित लेखक दत्तात्रय मेहेंदळे यांनी ‘भारतभर सायकलभ्रमण’ हा लेखसंग्रह लिहिलेला आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Bharatbhar Cyclebhraman : Jyeshthatlya Tarun Cycleswarachi Gatha
८७ वयाचे तरुण सायकलपटू आणि पुण्यात स्थायिक असणारे नोवोदित लेखक दत्तात्रय मेहेंदळे यांनी ‘भारतभर सायकलभ्रमण’ हा लेखसंग्रह लिहिलेला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
या पुस्तकात २७हून अधिक लेख आहेत. देशभरात विविध ठिकाणी मेहेंदळे यांनी सायकल भ्रमण केले. त्यांचे अनुभव त्यांनी या पुस्तकात सविस्तरपणे मांडलेले आहेत. आजही वयाच्या ८७व्या वर्षी ते पुणे शहरात सायकलवर फिरतात. पुणे शहर हे एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे, त्याचे साक्षीदार असलेले दत्तात्रय मेहेंदळे यांनी त्यांच्या सायकल भ्रमंतीच्या आठवणी या पुस्तकातून उलगडल्या आहेत. ते केवळ नुसतेच सायकलपटू नसून, त्यांनी १८० वेळा रक्तदानही केले आहे. वयाच्या या टप्प्यावर असताना त्यांनी संपूर्ण आयुष्यात जे जे केले त्यातील चांगल्या गोष्टी मांडायचा आणि त्यातून नव्या पिढीने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा उपदेश त्यांनी या पुस्तकातून दिला आहे.
लेखकाविषयी :
लेखक दत्तात्रय मेहेंदळे हे सध्या निवृत्त ज्येष्ठ नागरीक असून, सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे. त्यांनी अनेक सांस्कृतिक, सामाजिक कार्यांमध्ये सहभाग नोंदवला आहे. ते सातत्याने पर्यावरण आणि आरोग्य याविषयी सजग राहून कार्यरत आहेत. त्यांनी संपूर्ण आयुष्यात १८० वेळा रक्तदान केले आहे. अनेक संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सायकल चालवण्यासाठी अनेकांना ते प्रेरणा देतात तसेच सायकलचा ते प्रचार आणि प्रसार करतात. गेल्या साठ वर्षांत त्यांचे एकूण सायकलिंग साडेपाच लाख किलोमीटर झाले आहे. याही वयात ते पुणे शहरात सायकल चालवतात.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dattatray Mehendale |
Language | Marathi |
ISBN | 978-93-95139-90-8 |
Binding | Paperback |
Pages | 184 |
Publication Year | 06/11/2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |