Kowali Pane

BK00835

New product

लेखक, संपादक, संघटक आणि निवेदक असलेले संदीप काळे यांचे ‘कोवळी पाने’ हा कवितासंग्रह त्यांनी त्यांच्या कोवळ्या वयात लिहिलेल्या कविता आहे. त्यामुळे त्यांनी या कवितासंग्रहाला ‘कोवळी पाने’असे शीर्षक दिले आहे.

More details

₹ 125 tax incl.

More Info

या पुस्तकातील तीन कविता ह्या शेतकरी बापाचे दु:खं सांगणाऱ्या आहेत, बहुतांश कविता प्रेम या भावनेला भरती देणाऱ्या आहेत. या संग्रहात एकूण बत्तीस कविता आहेत. या संग्रहात छंदातील कविता आहेत, तशा काही मुक्तछंदातीलही आहेत. संदीप काळे यांच्या कवितेत काव्य आहे. प्रेमाविषयी एक प्रकारचे उत्कट भाव आहेत, कोवळ्या वयातील भावनांचे वर्णन त्यांनी या कवितेतून उत्तमप्रकारे सांगितलेले आहे. सामाजिक विषयांवर जाणीवपूर्वक लिहिणारे लेखक म्हणून ओळख असलेले संदीप यांची कविता ही अतिशय संवेदनशील आहे हे या छोटेखानी पुस्तकाचे यश आहे.

कवीविषयी :
संदीप काळे हे सध्या ‘सकाळ’माध्यम समूहात युवा संपादक म्हणून कार्यरत असून त्यांची एकूण ६७ पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांनी २२ दिवाळी अंकांचे संपादन केले आहे. १५० हून अधिक विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’ पुरवणीत त्यांचे ‘भ्रमंती लाईव्ह’ हे लोकप्रिय सदर सुरू असून ‘सकाळ यंग इन्सपीरेटर नेटवर्क अर्थात ‘यीन’ चे ते प्रमुख आहेत.

Reviews

Write a review

Kowali Pane

Kowali Pane

लेखक, संपादक, संघटक आणि निवेदक असलेले संदीप काळे यांचे ‘कोवळी पाने’ हा कवितासंग्रह त्यांनी त्यांच्या कोवळ्या वयात लिहिलेल्या कविता आहे. त्यामुळे त्यांनी या कवितासंग्रहाला ‘कोवळी पाने’असे शीर्षक दिले आहे.