BK00614
New product
'मृत्यू' कसा अटळ आणि सर्वव्यापी आहे, याचे आकलन म्हणजेच 'हे मृत्यो, तुझे भले होवो...!' ही कादंबरी.
Warning: Last items in stock!
Availability date:
He Mrutyo, Tuze Bhale Howo
'मृत्यू' कसा अटळ आणि सर्वव्यापी आहे, याचे आकलन म्हणजेच 'हे मृत्यो, तुझे भले होवो...!' ही कादंबरी.
Recipient :
* Required fields
or Cancel
आपल्या मृत मुलाला जिवंत करण्याच्या उद्देशाने वणवण फिरणाऱ्या एका आईला गौतम बुद्ध भेटतात. त्यांच्या सांगण्यावरून मृत्यू न झालेल्या घरातून मूठभर मोहरी मिळविण्यासाठी ती आई म्हणजे गोतमी धडपड करते. ही पारंपरिक कथा खरेतर अनित्य जीवनचक्रामध्ये मरणाची नित्यता किंवा अटळता दाखवून तिथेच थांबते. पण या धडपडीमध्ये तिला चक्क व्यास, अश्वत्थामासारखे काही चिरंजीव भेटतात. ते तिला मोहरी द्यायला तयारही होतात... मग कोणत्याही चमत्कारापेक्षाही प्रत्यक्ष प्रमाणावर भर देणारे गौतम बुद्ध खरोखरच तिच्या मुलाला जिवंत करू शकतील का?
मानवी जीवनातील अटळ सत्य म्हणजेच मृत्यू. मात्र, या गृहीतकाला आव्हान देणारी अनेक माणसे आपल्या वेद, उपनिषदे आणि पुराणांमध्ये आढळतात. मृत्यूच्या अटळतेला शरण जाण्यापेक्षा त्याच्याशी झुंज देणाऱ्या, त्याला सरळ प्रश्न विचारणाऱ्या, इतकेच नाही तर अमरता, चिरंजीवित्व यांच्या कक्षा धुंडाळू पाहणाऱ्या माणसांच्या कथांना या कादंबरीमधून वेगळे आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखकाविषयी : एस. एल. कुलकर्णी हे अॅग्रोवन या शेतकऱ्यांसाठी वाहिलेल्या दैनिकामध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत. बी. टेक (कृषी अभियांत्रिकी) पदवीधर असून, गेल्या पंधरा वर्षापासून शेती, ग्रामीण जीवन आणि तंत्रज्ञान यांविषयावर लेखन करतात. मराठी साहित्य, तत्त्वज्ञान आणि एकूणच वाचनावरील प्रेमापोटी त्यांनी पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या काही कथा, विज्ञान कथा व लेख प्रकाशित झाले आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | S. L. Kulkarni |
Language | Marathi |
ISBN | 978-93-95139-82-3 |
Binding | Paperback |
Pages | 92 |
Publication Year | 16/11/2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |