BK00705
New product
‘धूमधडाका’ हे मयुरेश कुलकर्णी यांनी लिहिलेला कथासंग्रह असून यात एकूण २७ कथा आहेत. वाचकांच्या निखळ मनोरंजनाबरोबरच वास्तव व्यवस्थेवर चिमटा काढण्याचे काम कुलकर्णी यांनी अगदी उत्तम पद्धतीने केले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Dhumdhadaka
‘धूमधडाका’ हे मयुरेश कुलकर्णी यांनी लिहिलेला कथासंग्रह असून यात एकूण २७ कथा आहेत. वाचकांच्या निखळ मनोरंजनाबरोबरच वास्तव व्यवस्थेवर चिमटा काढण्याचे काम कुलकर्णी यांनी अगदी उत्तम पद्धतीने केले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
‘धूमधडाका’ हे मयुरेश कुलकर्णी यांनी लिहिलेला कथासंग्रह असून यात एकूण २७ कथा आहेत. वाचकांच्या निखळ मनोरंजनाबरोबरच वास्तव व्यवस्थेवर चिमटा काढण्याचे काम कुलकर्णी यांनी अगदी उत्तम पद्धतीने केले आहे. या कथेतील काही अनुभव हे सत्य आहेत, तर काही अनुभव काल्पनिक आहेत. प्राण्यांचे साहित्य संमेलन अशी कल्पना करून यात लेखकाने एक कथा रचली आहे. काही कथा या ग्रामीण जीवनदर्शन घडवितात. कथांमधून लेखकाने जे मानवी स्वभावाचे बारकाईने निरीक्षण केले आहे ते अतिशय साधे आणि सोपे आहे. ‘निरक्षरांचा सर्व्हे’ ही एक अफलातून विनोदी कथा यात आहे. निखळ मनोरंजन करता करता माणसाच्या संवेदना जागृत व्हाव्यात आणि त्यातून माणसांनी समाजाला उपयोगी कार्य करण्याचा संकल्प हाती घ्यावा हा हेतू ठेवून लेखकाने हा कथासंग्रह लिहिलेला आहे.
लेखकाविषयी :
मयुरेश कुलकर्णी हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या शहरात वास्तव्य करत असून जिल्हा परिषद सोलापूर येथे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड असून, ते सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखन मंचाचे स्वीकृत सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य काव्यप्रेमी शिक्षक मंच आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, सोलापूरचे ते आजीवन सभासद आहेत. दैनिक सकाळ, दैनिक तरुणभारत या वर्तमानपत्रांतून त्यांचे नियमित लेखन प्रसिद्ध होते. ‘शिक्षण विवेक’ या मासिकातही नियमितपणे लेखन. ‘धूमधडाका’ हे त्यांचे पहिले पुस्तक आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | MAYURESH KULKARNI |
Language | Marathi |
ISBN | 9789395139960 |
Binding | Paperback |
Pages | 146 |
Publication Year | 2023 |
आयकर सल्लागार व वकील म्हणून पन्नासहून अधिक...
₹ 170