Home Minister

BK00746

New product

युवराज कोरे लिखित ‘होममिनिस्टर’ या कादंबरीचा मुख्य विषय राजकारण आहे. ही एक राजकीय सूडकथा आहे.

More details

₹ 180 tax incl.

More Info

युवराज कोरे लिखित ‘होममिनिस्टर’ या कादंबरीचा मुख्य विषय राजकारण आहे. ही एक राजकीय सूडकथा आहे. यात होम मिनिस्टर दादासाहेब देशमुख आणि विरोधी पक्षनेते राजाराम पाटील या दोघांमधील राजकीय संघर्ष लेखकाने गोष्टीरूपात मांडला आहे. या कादंबरीत दादासाहेब देशमुख यांची पत्नी पुष्पा यांच्या भूमिकेला प्राधान्य दिले आहे. पुष्पा या एक आदर्श माणूस म्हणून कशा जगल्या याचे सविस्तर वर्णन या कादंबरीत केले आहे. त्या एक पोलिस अधिकारी म्हणून, गृहिणी आणि लेखिका म्हणून त्यांचे जीवन कसे जगतात आणि त्यातून इतरांसाठी चांगला संदेश कशा देतात हे या कादंबरीतून युवराज कोरे यांनी अगदी सहजपणे आणि कसदार भाषेत मांडले आहे. चांगला संदेश देणारी ही एक वाचनीय अशी राजकीय कादंबरी आहे.

लेखकाविषयी:
लेखक युवराज कोरे हे सांगली जिल्ह्यातील तासगाव या तालुक्यातील ‘सावळज’ या ठिकाणी सध्या राहत असून त्यांचे छोटेसे झेरॉक्स सेंटर आहे. त्यांना लेखनाची, वाचनाची आवड असून, त्यांचे ‘महासत्तेच्या वाटेवर’ हे सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी बरीच वर्षे सांगली जिल्ह्यातील विविध दैनिकांसाठी मुक्त पत्रकारिताही केलेली आहे. ‘होममिनिस्टर’ हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorYuvraj Kore
LanguageMarathi
ISBN9788119311033
BindingPaperback
Pages108
Publication Year21/11/2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Home Minister

Home Minister

युवराज कोरे लिखित ‘होममिनिस्टर’ या कादंबरीचा मुख्य विषय राजकारण आहे. ही एक राजकीय सूडकथा आहे.