Anubhave Ale

BK00855

New product

सुमारे सहा दशके सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रताप पवार यांना जीवनात आलेल्या अनुभवांवर आधारित लेखमाला ‘सकाळ’च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध होत आहे. 

More details

पुस्तक २७ जानेवारीला सर्वत्र उपलब्ध होणार आहे

₹ 299 tax incl.

More Info

समाजाकडे तटस्थपणे पाहत त्यांनी टिपलेल्या निरीक्षणांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांवर विश्वस्त म्हणून कार्यरत असताना अनेक व्यक्तींबाबतचे अनुभव त्यांनी सहज, ओघवत्या भाषेत मांडले आहेत. जीवनात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींप्रमाणेच पुस्तकेही खूप काही शिकवत असतात, याबाबतचे अनुभव लक्षवेधक आहेत. देश-विदेशात प्रवास करताना त्या-त्या ठिकाणी आलेले अनुभव त्यांनी अतिशय रंजक पद्धतीने मांडले आहेत. त्यातून समाजासाठी एक प्रकारचा सकारात्मक संदेशही दिला आहे.

---------- 

औद्योगिक, सामाजिक आणि माध्यम क्षेत्रांत सहा दशकांहून अधिक काळ विजिगीषू वृत्तीने काम करणाऱ्या, सकाळ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष प्रताप गोविंदराव पवार यांच्या निवडक अनुभवांचा संग्रह असणारे पुस्तक ‘अनुभवें आले’
कधी एखाद्या देशाच्या इतिहासातील नोंदी, तर कधी वर्तमानाविषयीचा चिंतनशील दृष्टिकोन... कधी समस्या सोडवण्यासाठी घेतलेले कष्ट, तर कधी एखादा गमतीशीर अनुभव... कधी उद्योजकाची समयसूचकता, तर कधी एका खेड्यात जन्मलेल्या मुलाचे प्रसंगावधान... कधी व्यवस्थेला विचारलेले प्रश्न, तर कधी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर शोधलेली उत्तरे...
या साऱ्या लेखननोंदींमधून एका समृद्ध-संपन्न व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते; आणि त्याचबरोबर नकळत जगण्याविषयीचे शहाणपणही सापडते.
या अनुभवांतील सच्चेपणा, त्यातून मिळालेले ज्ञान आणि आलेले शहाणपण यांमुळे हे पुस्तक वाचकांसाठी अमूल्य ठरेल. सहज गप्पा माराव्या अशा पद्धतीने अनुभव सांगण्याची शैली वाचकांना लगेच आपलेसे करते.
संस्था - व्यक्ती यांच्यातील बलस्थाने शोधून, त्यांना एकमेकांशी जोडून सहकार्याने विकास साधण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करणाऱ्या, जगभर वेगवेगळ्या देशांत प्रवास करताना, आपल्या मातीतील समस्यांचे भान कधीही न सुटलेल्या एका उद्योजकाचे तरुण पिढीला उद्बोधक ठरणारे अनुभव चिंतन.
‘सकाळ सप्तरंग’मधील ‘अनुभवें आले’ या सदरातून लिहिलेल्या वाचकप्रिय लेखांचा संग्रह; आपल्या सर्वांसाठी एक अमूल्य ठेवा - ‘अनुभवें आले’

----------

अभिप्राय 

“आपण व्यक्त करत असलेले अनुभव वाचकांना प्रेरित आणि समृद्ध करणारे असतात. यातून आपल्या सालस, पारदर्शक आणि समाजशील व्यक्तिमत्त्वाची प्रचिती येते. असाच दिलखुलास संवाद साधून आपण अखंडपणे स्फुल्लिंग जागृती करत राहावे हीच सदिच्छा!”
डॉ. रघुनाथ कडाकणे
इंग्रजी विभाग प्रमुख, राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर


“आज तुमचा ‘सप्तरंग’ मधील लेख आणि वाटचाल भाग १ वाचून झाले. तुमचे लेखन मला सहज आणि प्रामाणिक वाटते. इतकी साधी, सरळ शैली फार अभावाने आढळते. तुमचे लेखन ‘स्व अनुभव’ असूनही तुम्ही ‘स्व’ला एका छान अंतरावर उभे करता हे मला तुमचे वेगळेपण वाटते. अनुभवाने तर तुम्ही समृद्ध आहातच; पण ते वाचकांपर्यंत तुम्ही सहजपणे पोहोचवता. तुमचे स्वतःचे प्रकाशनगृह असल्याने साहजिक ते पुस्तकरूपात ‘सकाळ’मार्फत येणे योग्य आणि उचित आहे. एरवी तुम्ही ‘राजहंस’चे लेखक झालेले मला आवडले असते.
असो. या सर्व लेखनाबद्दल तुमचे अभिनंदन.”
दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन

“आपले लेखन हे ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे असल्याने त्याचा वाचकांवरील प्रभाव हा दीर्घकालीन आहे. आजचा आपला लेख हा शैक्षणिक आदानप्रदान प्रक्रियेची नवीन दृष्टी नक्कीच देतो. प्रयोगशील शिक्षणपद्धती आणि समाजकार्यरचनेसाठी आपले अनुभव अतिशय मोलाचे व मार्गदर्शक आहेत.”
प्रा. डॉ. दीपक ताटपुजे, सातारा

“Today's article is an excellent example how mother can help children to grow with principles. Moreover from the beginning you were determined to be successful entrepreneur with social responsibility; and time management is the key of success. Your article shall be pathway for everyone and show that one can own empire with time management and respect for all concerned.”
Adv. S. K. Jain
Chairman, Managing Council Shikshana Prasaraka Mandali

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPratap Pawar
LanguageMarathi
ISBN978-81-19311-84-2
BindingPaperback
Pages272
Publication Year2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Anubhave Ale

Anubhave Ale

सुमारे सहा दशके सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रताप पवार यांना जीवनात आलेल्या अनुभवांवर आधारित लेखमाला ‘सकाळ’च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध होत आहे. 

Customers who bought this product also bought: