Himalayatil Diwas

BK00837

New product

हिमालयातील दिवस या पुस्तकात हिमालयातील अवघड, कस पाहणाऱ्या गिरिशिखरांवरील चढाईचे अनुभव तर आहेतच, पण त्याबरोबर तेथील निसर्ग, प्राणी, पक्षी, माणसे, अशा विविध विषयांवर लेखकाचे प्रत्यक्षानुभव या पुस्तकात मांडले आहेत.

More details

₹ 375 tax incl.

More Info

गिर्यारोहणाचा छंद जोपासायचा तर त्याबरोबर येणारी आव्हाने, खडतर प्रवास, धोकेही स्वीकारायला हवेत आणि त्यातून सुरक्षितपणे शिखरावर पोहोचण्याची जिद्द बाळगायला हवी. आणि अशी जिद्द बाळगणाऱ्या माणसांना गिरिशिखरे कायमच साद घालतात. त्यातही हिमालयातील गिरिशिखरे पादाक्रांत करण्याची इच्छा प्रत्येक गिर्यारोहकांचे स्वप्न असते. हिमालयातील दिवस या पुस्तकात हिमालयातील अवघड, कस पाहणाऱ्या गिरिशिखरांवरील चढाईचे अनुभव तर आहेतच, पण त्याबरोबर तेथील निसर्ग, प्राणी, पक्षी, माणसे, अशा विविध विषयांवर लेखकाचे प्रत्यक्षानुभव या पुस्तकात मांडले आहेत. हिमालयातील अद्भुत वातावरण हे पुस्तक आपल्यासमोर उभे करते. त्याचबरोबर एव्हरेस्ट आणि हिमालयातील अन्य मोठमोठ्या शिखरांवरील चढाईसंदर्भातील वाचनीय अनुभव हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

लेखकाविषयी : उमेश झिरपे हे उत्तम गिर्यारोहक, नावाजलेले गिर्यारोहण मार्गदर्शक आणि गिरिप्रेमी संस्थेचे संस्थापक आहेत. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि सर्व वयोगटातील माणसांना छोटे मोठे ट्रेकचे आयोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या संस्थेमार्फत ते सातत्याने करीत असतात. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गिर्यारोहण या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करून त्यासाठीचे मार्गदर्शन देण्याचे कामही ते करत आहेत. विविध वृत्तपत्रांत त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorUmesh Zirpe
LanguageMarathi
ISBN978-81-19311-78-1
BindingPaperback
Pages184
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Himalayatil Diwas

Himalayatil Diwas

हिमालयातील दिवस या पुस्तकात हिमालयातील अवघड, कस पाहणाऱ्या गिरिशिखरांवरील चढाईचे अनुभव तर आहेतच, पण त्याबरोबर तेथील निसर्ग, प्राणी, पक्षी, माणसे, अशा विविध विषयांवर लेखकाचे प्रत्यक्षानुभव या पुस्तकात मांडले आहेत.

Customers who bought this product also bought:

  • Samarth Ramdasanni Sthapan Kelele Akara Maruti

    भक्तिमार्गाने समाज संघटित होतो,  असे समर्थांना...

    ₹ 150