BK00714
New product
गीतेमधील सर्व श्लोकांचे ओवीरूप सटीक विवरण लेखक आणि अभ्यासक आर. जी. पाटील यांनी ‘ओवीरूप श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथात केलेला आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Oviroop ShrimadBhagwadgita
गीतेमधील सर्व श्लोकांचे ओवीरूप सटीक विवरण लेखक आणि अभ्यासक आर. जी. पाटील यांनी ‘ओवीरूप श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथात केलेला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ माणसाला लाभलेली एक दुर्मिळ अशी भेट आहे. हा ग्रंथ भारतीयांसाठी परिचित असला तरीही अनेकांना तो अपरिचित आहे. गीतेचे आचरण कठीण असले तरी सगळ्यांना गीता जाणून घेणे शक्य आहे. गीतेमधील अनेक श्लोक परस्परांशी जोडलेले आहेत. या सर्व श्लोकांचे ओवीरूप सटीक विवरण लेखक आणि अभ्यासक आर. जी. पाटील यांनी ‘ओवीरूप श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथात केलेला आहे. मराठी भाषेतील श्लोकांचे हे ओवीरूप समजायला आणि पाठांतरास सोपे आहे. या ओवीरूपात चारही चरणांचा अर्थ क्रमाने दिलेला आहे. काही ठिकाणी एकेक चरण तर काही ठिकाणी एकापेक्षा अधिक चरण एकत्रित घेऊन अर्थ स्पष्ट केलेला आहे. हे ओवीरूप आशयसंपन्न असून हा आशय शक्य तितक्या मोजक्या शब्दात देण्याचा प्रयत्न लेखक आर. जी. पाटील यांनी प्रस्तुत ग्रंथात केला आहे.
लेखकाविषयी :
आर. जी. पाटील हे अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात त्यांनी २००८ पर्यंत काम केले. सेवानिवृत्तीपूर्वी चार वर्षे त्यांनी प्राचार्यपदावरही काम केले. परतत्त्वाला स्पर्श करणारे साहित्य सामान्य जनांना सहजपणे समजेल अशा भाषेत रूपांतरित करावे असा त्यांना छंद आहे. ‘ओवीरूप श्रीमद्भगवद्गीता’ हा ग्रंथ त्याच छंदाचा आविष्कार आहे. ‘सुलभ ओवीरूप ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुका आकाशाएवढा’ हे दोन ग्रंथ त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | R. G. Patil |
Language | Marathi |
ISBN | 978-81-962345-0-8 |
Binding | Paperback |
Pages | 602 |
Publication Year | 06/12/2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |