Bavankashi

BK00859

New product

“बावनकशी” हा श्री. महेंद्र कोंडे यांचा पहिला कवितासंग्रह.

More details

₹ 170 tax incl.

More Info

“बावनकशी” हा श्री. महेंद्र कोंडे यांचा पहिला कवितासंग्रह. अस्सल मराठी भाषेचा पीळ त्यांच्या कवितेला आहे. प्रीतीच्या विविध छटा त्यांनी आपल्या कवितांतून व्यक्त केल्या आहेत. कवितेची अनुभूती कुठल्याही एका साच्यात बंदिस्त होऊ नये म्हणून त्यांनी घेतलेली काळजी कौतुकास्पद आहे. जीवनाच्या विविधतेला स्पर्श करणारी श्री. महेंद्र कोंडे यांची कविता रसिकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. शब्दांचे हे सोने बावनकशी आहे.
- मंगेश पाडगावकर

लेखकाविषयी :
महेंद्र कोंडे हे नवी मुंबई, महानगरपालिका येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अनेक दैनिके, नियतकालिके, दिवाळी अंकातून सातत्याने त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते. आकाशवाणी, मुंबई येथील ते मान्यता प्राप्त नाट्य कलावंत आहेत. आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांसाठी त्यांनी संहिता लेखन, निवेदन, काव्यवाचन केले आहे. याशिवाय ते विविध प्रकारच्या साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमांचे १९८८पासून सातत्याने सूत्र संचालन, निवेदन करत आहेत. त्यांना काव्यवाचन, काव्यलेखन, कथालेखन स्पर्धांमध्ये ५०हून अधिक राज्य, जिल्हास्तरीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorMahendra Konde
LanguageMarathi
ISBN978-81-19311-55-2
BindingPaperback
Pages84
Publication Year15/12/2023
Dimensions5.7 x 8

Reviews

Write a review

Bavankashi

Bavankashi

“बावनकशी” हा श्री. महेंद्र कोंडे यांचा पहिला कवितासंग्रह.