Aai-Babachi Diary

BK00611

New product

या पुस्तकातल्या आई-बाबानी आपल्या समस्या त्यांच्या डायरीत मोकळेपणाने मांडल्या आहेत. त्या समस्यांवर आपल्या बुद्धीने मार्ग काढला आहे. ही डायरी वाचून पालकत्व निभावताना आई-बाबाला नक्कीच दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो. 

More details

₹ 170 tax incl.

More Info

पालकत्व निभावताना आई-बाबा दोघांचीही स्वतंत्र लढाई असते. सध्याच्या काळात बाबासोबत आईही आता कमावती, घरची कर्ती स्त्री झालेली आहे. त्यामुळे मुलांच्या संगोपनात बाबाही दोन पावलं पुढे सरकला आहे. मुलांच्या जन्मात, संगोपनात जमेल तसा वेळ देतो, मनापासून त्यांचा अभ्यास घेतो. मुलांना वाढवण्यासाठी आवश्यक अशा अनेक गोष्टी शिकून घेतो. कधी कधी मुलांना शिस्तीच्या आईपेक्षा मऊ स्वभावाचा आणि मुलांचं सर्व काही ऐकणारा बाबा हवासा वाटतो. अशी ही बाबाची बदललेली भूमिका खूपच लोभसवाणी आहे. या पुस्तकातल्या आई-बाबानी आपल्या समस्या त्यांच्या डायरीत मोकळेपणाने मांडल्या आहेत. त्या समस्यांवर आपल्या बुद्धीने मार्ग काढला आहे. ही डायरी वाचून पालकत्व निभावताना आई-बाबाला नक्कीच दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो.

लेखकाविषयी :
डॉ श्रुती पानसे या मेंदू अभ्यासक आहेत. महाराष्ट्रातल्या विविध वर्तमानपत्रांमध्ये मेंदूशी मैत्री, मस्ती की पाठशाला, खोकं नव्हे डोकं, इत्यादी लेखमालांचं लेखन. 'मेंदूचा पासवर्ड', 'पहिली आठ वर्षे', 'जादूचा मेंदू', 'भावनांच्या जगात', 'डोक्यात डोकवा', 'बहुरंगी बुध्दिमत्ता', 'टीनएजर्सच्या मनात', '@20- विशीच्या उंबरठ्यावरील मुलांशी संवाद' अशा 21 पुस्तकांचं लेखन.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Shruti Panse
LanguageMarathi
ISBN9788119311798
BindingPaperback
Pages110
Publication Year01-01-2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Aai-Babachi Diary

Aai-Babachi Diary

या पुस्तकातल्या आई-बाबानी आपल्या समस्या त्यांच्या डायरीत मोकळेपणाने मांडल्या आहेत. त्या समस्यांवर आपल्या बुद्धीने मार्ग काढला आहे. ही डायरी वाचून पालकत्व निभावताना आई-बाबाला नक्कीच दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो.