Jeevan Pravah

BK00768

New product

‘जीवन प्रवाह’ हा कवितासंग्रह डॉ. दीपक भोजराज यांनी लिहिला असून, या संग्रहात त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव, जीवनविषयक दृष्टिकोन आणि आकलन त्यांच्या कवितेतून सहजपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

More details

₹ 260 tax incl.

More Info

मानवी जीवन, मनातल्या कविता, निसर्ग, सामाजिक आणि राजकीय भान, चारोळ्या, हलक्याफुलक्या कविता या विविध विषयांवर त्यांनी या पुस्तकात कविता केल्या आहेत. १३० हून अधिक कविता या संग्रहात आहेत. कवी भोजराज यांची बहीण तरंगिणी कुलकर्णी यांच्याही काही कविता पुस्तकाच्या परिशिष्ठात समाविष्ट केल्या आहेत. प्रत्येक कविताप्रेमी वाचकाला भुरळ पडावी असा हा ‘जीवन प्रवाह’ कवितासंग्रह प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच वाचायला हवा.

कवीविषयी :
कवी दीपक भोजराज हे मूळ विदर्भातील असून, त्यांनी अमेरिकेत चाळीस वर्षे राहून वैद्यकीय सेवा केली. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे. त्यांना लिहायला आवडते. मराठी भाषेवर प्रेम असल्याने त्यांनी अमेरिकेत राहूनही मराठीचा व्यासंग सोडला नाही. सातत्याने त्यांनी वाचन आणि लेखन केले. तसेच अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. उत्तर अमेरिकेतील ‘एकता’ या त्रैमासिकात त्यांच्या काही कविताही प्रसिद्ध झाल्या आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Deepak Bhojraj, Tarangini Kulkarni
LanguageMarathi
ISBN978-81-19311-92-7
BindingPaperback
Pages164
Publication Year03/01/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Jeevan Pravah

Jeevan Pravah

‘जीवन प्रवाह’ हा कवितासंग्रह डॉ. दीपक भोजराज यांनी लिहिला असून, या संग्रहात त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव, जीवनविषयक दृष्टिकोन आणि आकलन त्यांच्या कवितेतून सहजपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.