BK00802
New product
आजच्या तरुणाईनं स्वातंत्र्य की लग्नबंधन हा निर्णय कसा घ्यायचा? हे जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक!
Warning: Last items in stock!
Availability date:
Swatantrya Ki Lagnabandhan?
आजच्या तरुणाईनं स्वातंत्र्य की लग्नबंधन हा निर्णय कसा घ्यायचा? हे जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक!
Recipient :
* Required fields
or Cancel
आजच्या तरुणाईचं करिअरला प्राधान्य असलं तरी लग्न आणि कुटुंब तसंच त्यातून मिळणारं स्थैर्य आणि सौख्य हेही त्यांना हवं आहे. दोन्हींची सांगड कशी घालायची याचा मात्र त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. 'लव्ह अॅट फर्स्ट साइट अॅंड डिवोर्स अॅट फर्स्ट फाइट' अशी आजची परिस्थिती आहे. लग्न निभावणं सोपं नसतंच, पण एकटं राहणं तरी कुठे सोपं असतं? अशा परिस्थितीत आजच्या तरुणाईनं स्वातंत्र्य की लग्नबंधन हा निर्णय घ्यायचा तरी कसा? हे जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक म्हणजे स्वातंत्र्य की लग्नबंधन.
लेखकाविषयी :
शिवराज गोर्ले हे नामांकित लेखक असून त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलर्स आहेत. त्यांनी फिलिप्स, किर्लोस्कर अशा नामांकित कंपन्यांमध्ये‘एक्झिक्युटिव्ह’ पदावर काम केलेलं आहे. नंतर कॉर्पोरेट करिअर सोडून पूर्णवेळ लेखन . गेली ४० वर्षे विविध माध्यमांतून लेखन.
थरथराट, खतरनाक, बाप रे बाप, धुमाकूळ, बंडलबाज, धांगडधिंगा, सूडचक्र, सवाल माझ्या प्रेमाचा, चिमणी पाखरं अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचे पटकथा-संवाद लेखन. ‘घरकुल’ ही लोकप्रिय दूरदर्शन मालिका.
मजेत कसं जगावं? यशस्वी कसं व्हावं? घडवा स्वतःला फुलवा स्वतःला, तुम्ही बदलू शकता, माझ्या प्रिय मुला ही अशी काही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Shivraj Gorle |
Language | Marathi |
ISBN | 9788119311750 |
Binding | Paperback |
Pages | 160 |
Publication Year | 12/02/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |
₹ 240
माजी प्रशासकीय अधिकारी व साखर आयुक्त श्री. शेखर...
₹ 240
बानूबाईंचे महत्त्वाकांक्षी आणि सहृदयी...
₹ 200
₹ 390