Ahe Sugam Tari...

BK00787

New product

गणित हा विषय अनेकांच्या आयुष्यात भीतीदायक विषय असतो. पण आपले जीवन सोपे व्हावे म्हणून गणिताचा उगम झाला आहे, ही गोष्ट लेखक विजय श्रोत्रिय यांनी या पुस्तकात रंजक पद्धतीने मांडली आहे. 

More details

₹ 220 tax incl.

More Info

गणित ही देखील एक भाषा आहे आणि ते जर भाषेसारखं शिकलं गेलं तर हा विषय सहज, सुंदर आणि सोपा कसा होईल हे लेखकाने या पुस्तकात सविस्तरपणे मांडले आहे.
गणित म्हणजे नेमकं काय? ते का शिकायचं असतं? त्याचा आपल्या जीवनाशी संबंध कसा असतो हे लेखकाने अतिशय प्रभावीपणे या पुस्तकातून सांगितले आहे.
शालेय वयातच तर्कनिष्ठ विचार कसा करायचा आणि ते प्रत्यक्षात कसे आणायचे याचे अर्थपूर्ण विवेचन ‘आहे सुगम तरी...’ या पुस्तकात आहे.
स्वतःचा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता प्राप्त व्हावी हीच या लिखाणामागची प्रेरणा आहे.

लेखकाविषयी :
डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, भारत सरकार, दिल्ली येथे आठ वर्षे सीनियर सायंटिफिक ऑफिसर म्हणून काम केले.
कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये पंचवीस वर्षे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम केले.
अनेक कॉलेजेस, विद्यापीठात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केले.
ऑस्ट्रेलिया आणि पुण्यातील शाळेत गणिती विचारपद्धतीचे अध्यापन केले.
हे त्यांचे पहिलेच पुस्तक असून त्यांना वाचन, शास्त्रीय संगीत आणि ट्रेकिंगची आवड आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorVijay Shrotriya
LanguageMarathi
ISBN9788119311811
BindingPaperback
Pages128
Publication Year13/02/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Ahe Sugam Tari...

Ahe Sugam Tari...

गणित हा विषय अनेकांच्या आयुष्यात भीतीदायक विषय असतो. पण आपले जीवन सोपे व्हावे म्हणून गणिताचा उगम झाला आहे, ही गोष्ट लेखक विजय श्रोत्रिय यांनी या पुस्तकात रंजक पद्धतीने मांडली आहे.