Zadezudpe Lawa, Pashudhan Jagava

Krushnaji Mahadeo Kokate

New product

पशुपालन हा शेतीइतकाच प्राचीन उद्योग आहे. आधुनिक काळात वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत गेला. वाढत्या मनुष्यसंख्येची गरज भागवायला लागणारे वाढते पशुधन जोपासण्यासाठी आवश्यक पौष्टिक चारा उपलब्ध होणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी चाऱ्यासाठी झाडेझुडपे लावणे हा एक महत्त्वाचा, फायदेशीर पूरक उद्योग आहे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणारे पुस्तक.

More details

₹ 299 tax incl.

More Info

  • चाऱ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या झाडाझुडपांचा सविस्तर परिचय
  • लागणारी जमीन, हवामान, लागवड, पीक वाढीचा कालावधी, कापणी, साठवण अशी सर्वांगीण माहिती
  • पाऊसपाण्याच्या प्रमाणानुसार कोणती झाडे लावावी याविषयी मार्गदर्शन
  • ओल्या आणि कोरड्या चाऱ्यातील विविध पौष्टिक गुणांची शास्त्रीय माहिती
  • झाडाच्या वेगवेगळ्या भागांचा उपयोग चारा किंवा मूरघास बनवण्यासाठी कसा करावा याविषयी सूचना

या झाडाझुडपांची लागवड कमी आकाराची / उंचसखल / तुकड्यातुकड्यांची जमीन वापरूनही करता येते. त्यामुळे पडीक जमीनही उपयोगात आणून अधिक आर्थिक फायदा मिळवता येतो. अशा विविध अंगांनी फायदेशीर ठरणाऱ्या चारा उद्योगासाठी उपयुक्त आणि संग्राह्य पुस्तक झाडेझुडपे लावा पशुधन जगवा

लेखकाविषयी :
कृष्णाजी महादेव कोकाटे
• बी.एस्सी. (कृषी) कृषी महाविद्यालय, पुणे
• रुरल एक्सटेन्शन ट्रेनर्स कोर्स, फिलिपाईन्स
• डेअरी एक्स्टेन्शन कोर्स, डिपार्टमेंट ऑफ प्रायमरी इंडस्ट्रीज, क्विन्स लँड, ऑस्ट्रेलिया
• २००५मध्ये बाएफ संस्थेतून अतिरिक्त कार्यक्रम संचालक म्हणून सेवानिवृत्त
• कृषी सल्लागार, बाएफ (२००५ ते २०२०)
• तांत्रिक अधिकारी, विभागीय संशोधन केंद्र , बाएफ, अखिल भारतीय चारा संशोधन केंद्र, नवी दिल्ली (२००५ ते २०२०)
• अभ्यास मार्गदर्शक, विभागीय अभ्यास केंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (२००५ ते २०२०)
• सध्या कृषिविषयक पुस्तकलेखनात व्यग्र

Features

PublisherSakal Prakashan
AuthorKrushnaji Mahadeo Kokate
LanguageMarathi
ISBN978-81-19311-64-4
BindingPaperback
Pages168
Publication Year2028-05-06
Dimensions7 x 9.5

Reviews

Write a review