BK00765
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Ek Kan Ayurvedacha
Recipient :
* Required fields
or Cancel
पृथ्वीवर आज उपलब्ध असलेल्या वैद्यकशास्त्रांपैकी सर्वात प्राचीन, आजही उपयोगात असणारे आणि प्रत्यक्ष परिणाम दाखवणारे आयुर्वेद हे एकमेव वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदाबद्दल आज जगात सर्वत्र उत्सुकता वाढत आहे. अशावेळी वारसाहक्काने मिळालेल्या आपल्याच भारतीय वैद्यकशास्त्राची आपल्याला नीट ओळख होणे, ही काळाची गरज आहे, यासाठीच आयुर्वेदशास्त्र जसे आहे तसे, सोप्या भाषेत समजून घेणे हे केवळ आयुर्वेदतज्ज्ञांचेच नव्हे, तर प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी वैद्य रमा खटावकर लिखित ‘कण आयुर्वेदाचा’ अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण असे पुस्तक आहे.
लेखिकेविषयी :
वैद्य रमा खटावकर या एमडी आयुर्वेद असून, त्या आयुर्वेदिक स्त्रीरोग प्रसूती तज्ञ आहेत. गेल्या पंचवीसपेक्षा अधिक वर्षांपासून आयुर्वेदाचे अध्ययन, अध्यापन आणि रुग्णचिकित्सेचा अनुभव त्यांना आहे. सध्या त्या उत्तर प्रदेश येथील वैद्य यज्ञदत्त शर्मा आयुर्वेद महाविद्यालायत प्रोफेसर आणि विभागप्रमुख (स्त्रीरोग प्रसूतीतंत्र) म्हणून कार्यरत आहेत. सातत्याने त्या आयुर्वेद या विषयावर विविध मासिकांत, दिवाळी अंकात लेखन करत असतात.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Vaidya Rama Khatavkar |
Language | Marathi |
ISBN | 978-81-19311-77-4 |
Binding | Paperback |
Pages | 168 |
Publication Year | 2024-05-06 |
Dimensions | 5.5 x 8.5 |