BK00864
New product
शरीरमनाचे संतुलन राखून आत्मस्वास्थ्य प्राप्त करण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होण्यासाठी वैदिक आणि यौगिक परंपरेचा वारसा सांगणाया गुरुवर्यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन सर्वसामान्य वाचकांसाठी उपलब्ध करून देणारा ग्रंथ - अवेकनिंग यूंवर ब्लिस
Warning: Last items in stock!
Availability date: 05/20/2024
Awakening Your Bliss : Atmashodhatun Parmanand Prapti (Paperback)
शरीरमनाचे संतुलन राखून आत्मस्वास्थ्य प्राप्त करण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होण्यासाठी वैदिक आणि यौगिक परंपरेचा वारसा सांगणाया गुरुवर्यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन सर्वसामान्य वाचकांसाठी उपलब्ध करून देणारा ग्रंथ - अवेकनिंग यूंवर ब्लिस
Recipient :
* Required fields
or Cancel
आनंद म्हणजे नेमके काय, हे शोधताना कस्तुरीमृगाची गोष्ट आठवते. स्वतःच्या नाभीत दडलेल्या कस्तुरी सुगंधाच्या शोधात तो सगळीकडे सैरावैरा पळतो. पण त्याला काही केल्या त्या सुगंधाचे उगमस्थान सापडत नाही. म्हणतात ना तुझे आहे तुजपाशी, पण तू जागा चुकलासी !
आज प्रत्येकाला काय हवे आहे, याचे निश्चित उत्तर देता येते का? उत्तरादाखल आपण काही भौतिक गोष्टींची यादी वाचली, आणि त्या मिळाल्या तरी आपण खरेच कायमस्वरूपी आनंदी राहू शकू. याची खात्री वाटते का? याचे उत्तर नकारार्थी येते. कारण केवळ उपभोगामध्ये काळ व्यतीत करणे यामध्ये मनुष्यजन्माचे सार्थक नाही. मनाला कायमस्वरूपी आनंद कसा मिळेल, जीव आनंदस्वरूप कसा होईल, हे पाहणे गरजेचे आहे. म्हणूनच सर्वप्रथम आनंदाचे खरे स्वरूप समजून घेतले पाहिजे.
सुख, समाधान, उल्हास, अशा दैहिक भावनांच्या पलीकडे गेल्याशिवाय अ-क्षय आनंदाची दिशा सापडत नाही. स्वयंशिस्त, भावनांवर नियंत्रण, ईश्वराची उपासना, आणि नामः स्मरणरूपी साधनेच्या प्रकाशात आत्मशोधाची वाट चालू लागलो की, मन व बुद्धी स्थिर होऊ लागते. आणि मग आपल्यातच दडलेला आत्मानंदाचा प्रकाश मनभर आणि नंतर आजूबाजूसही पसरू लागतो. मनुष्यजन्माला आलेल्या प्रत्येकाने जन्म ते मृत्यूपर्यंतचे जीवन विशिष्ट ध्येयाने व्यतीत करणे हितावह असल्याने आत्मानंदाप्रत पोचण्याची ही प्रक्रिया सोपी नसली तरी आवश्यक आहे. अशा वेळी भारतीय तत्त्वज्ञानातील अध्यात्मविचार साकल्याने समजून घेणे आवश्यक ठरते.
कळले तरी वळत नाही, अशा या आजच्या जगात आत्मानंदाचा शोध कसा घ्यावा, त्यासाठी दैनंदिन स्तरावर काय केले पाहिजे, याबद्दल थोरामोठ्यांनी काही सांगितले, तर ते निश्चितच उपयोगी ठरेल. शरीरमनाचे संतुलन राखून आत्मस्वास्थ्य प्राप्त करण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होण्यासाठी वैदिक आणि यौगिक परंपरेचा वारसा सांगणाया गुरुवर्यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन सर्वसामान्य वाचकांसाठी उपलब्ध करून देणारा ग्रंथ - अवेकनिंग यूंवर ब्लिस
लेखकाविषयी :
रसिकमान्य ठरलेल्या ऐतिवतहासिक - पौराणिक - चरित्र कादंबऱ्यांचे लेखक. आजवर १५ पुस्तके प्रकाशित. विविध पुस्तकांचे इंग्लिश, गुजराती, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषांमधून अनुवाद. 'विहंग प्रकाशन'मार्फत मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती या चार भाषांमध्ये उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित.
चित्रपट क्षेत्रात सुमारे नऊ वर्षे लेखन-दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध क्षेत्रांत काम.
‘मायबोली’ वाहिनीवर त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. प्राचीन भारतीय शास्त्रांचे अभ्यासक आणि निरूपणकर्ते.
गीताशास्त्र, दैनंदिन भगवद्गीता, बृहत् गीताशास्त्र (दोन खंड) हे ग्रंथ प्रकाशित. अध्यात्म, श्रीमद्भगवद्गीता, महाभारत, यातील विविध विषयांवर जवळपास ५०० व्याख्याने. अनेक दिवाळी अंक, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून लेख, कथा प्रकाशित.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Rajendra Kher |
Language | Marathi |
ISBN | 978-81-19311-46-0 |
Binding | Paperback |
Pages | 240 |
Publication Year | 2024-05-09 |
Dimensions | 6.14 x 9.21 |
₹ 250
स्वास्थ्यपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी, समाजासाठी...
₹ 280
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या...
₹ 239
आरोग्यदायी आहाराचं गाईड गतिमान जीवनशैलीत...
₹ 240
स्वयंपाकघरातील दवाखाना काळाच्या ओघात स्वयंपाकघर...
₹ 240